ETV Bharat / state

BJP leaders Acquitted : पुराव्याअभावी भाजपच्या 'या' पाच प्रमुख नेत्यांची निर्दोष सुटका - भाजपच्या या पाच प्रमुख नेत्यांची निर्दोष सुटका

मालेगाव मध्ये झालेल्या हिंसाचारादरम्यान (Malegaon Violence) हिंदू लोकांवर दगडफेक करण्यात आल्याच्या निषेधार्थ आझाद मैदान येथे आंदोलन (Azad Maidan agitation case) करण्यात आले होते. आझाद मैदान पोलिसांनी भाजप नेते प्रवीण दरेकर, माजी मुंबई शहर अध्यक्ष मंगल प्रभात लोढा, आमदार राहुल नार्वेकर, माजी नगरसेवक आकाश पुरोहित, अतुल शहा, राजेश शिरवळकर, शरद चेतनकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. (acquit five BJP leaders).

Etv Bharat
Etv Bharat
author img

By

Published : Dec 17, 2022, 10:49 PM IST

मुंबई : त्रिपुरातील हिंसाचाराच्या विरोधात मालेगाव मध्ये झालेल्या आंदोलनादरम्यान हिंसाचार झाला होता. (Malegaon Violence). या विरोधात मुंबईत भारतीय जनता पार्टीच्या वतीने आंदोलन करण्यात आले होते. (Azad Maidan agitation case). या आंदोलनादरम्यान भाजपच्या पाच नेत्यांविरोधात आझाद मैदान पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातून आज गिरगाव महानगर दंडाधिकारी न्यायालयाने पाचही आरोपींची कुठलेही पुरावे नसल्याने निर्दोष सुटका केली आहे. (5 BJP leaders Acquitted).

आझाद मैदान येथे आंदोलन : मालेगाव मध्ये झालेल्या हिंसाचारादरम्यान हिंदू लोकांवर दगडफेक करण्यात आल्याच्या निषेधार्थ आझाद मैदान येथे आंदोलन करण्यात आले होते. आझाद मैदान पोलिसांनी भाजप नेते प्रवीण दरेकर, माजी मुंबई शहर अध्यक्ष मंगल प्रभात लोढा, आमदार राहुल नार्वेकर, माजी नगरसेवक आकाश पुरोहित, अतुल शहा राजेश शिरवळकर, शरद चेतनकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. या सर्व आरोपींविरोधात आयपीसी कलम 269, 447, 37(1) (3), 135 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पुरावे उपलब्ध करण्यात पोलीसांना अपयश : गिरगाव महानगर दंडाधिकारी न्यायालयाने या प्रकरणातील या सर्व आरोपींविरोधात कुठलेही पुरावे नसल्यामुळे निर्दोष सुटका करण्यात आली असल्याचा निर्णय न्यायाधीश एन.ए. पटेल यांनी दिला आहे. भाजपच्या वतीने वकील अखिलेश दुबे यांनी या सर्व आरोपींची बाजू न्यायालयासमोर मांडली होती. तर विरोधात पुरावे उपलब्ध करण्यात पोलीस प्रशासनाला यश आले नाही.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.