ETV Bharat / state

मराठमोळ्या सणाचा जल्लोष घुमणार, गिरणगावात असा साजरा होणार पाडवा

गिरणगाव हे उत्सवाचे माहेरघर आहे. गिरणगावची सांस्कृतिक परंपरा व ऐक्य जतन करण्याचे काम आम्ही या शोभायात्रेतून करु, असे समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

गिरणगावात पाडव्याची जय्यत तयारी
author img

By

Published : Apr 4, 2019, 8:23 AM IST

मुंबई - लालबाग,परळ आणि काळाचौकी या गिरणगाव विभागातील वैद्यकीय क्षेत्र, पोलीस विभाग आणि सामाजिक क्षेत्रातील महिलांना गिरणगाव सांस्कृतिक प्रतिष्ठान ‘गिरणगावचा पाडवा’ या शोभायात्रेत भारतमातेच्या पालखीचा मान देण्यात येणार आहे. यासोबतच सामाजिक क्षेत्रात रुग्ण सेवा आणि ईश्वर सेवेसाठी कार्यरत असणारी परळमधील ‘नाना पालकर रुग्ण सेवा समिती’ या संस्थेस ‘गिरणगावभूषण पुरस्कार’ देण्यात येणार आहे.

या शोभायात्रेत दुर्गवीर प्रतिष्ठानच्या महिलांचे दांडपट्टा सादरीकरण, स्वयंसिध्द महिला मंडळाचे पारंपारिक वेशभूषेतील मराठमोळ्या खेळांचे सादरीकरण, बालविकास मंडळ, काळेवाडी यांचे महिलांचे लेझीम पथक, नृत्यदर्शन नृत्यालयाचे कथक सादरीकरण आणि बाईकस्वार महिलांचा स्त्रीशक्तीचा जागर हे या शोभायात्रेचे मुख्य आकर्षण असेल. हिंदू नववर्षानिमित्त समितीच्या वतीने या भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात येते. यंदाही या शोभायात्रेचा शुभारंभ ढोल-ताशांच्या गजरात परळ येथील स्वामी समर्थ मठातून शनिवारी ६ एप्रिलला सकाळी ७ वाजता होईल आणि शोभायात्रेचा समारोप चिंचपोकळी दक्षिण विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, मुक्ता जयहिंद सिनेमागृह इथे होणार आहे.

गिरणगावात पाडव्याची जय्यत तयारी

या शोभायात्रेत श्री शिवराय चित्ररथ, १५ फूट उंचीची भारतमातेची प्रतिमा, देवभूमी महाराष्ट्र संस्कृती चित्ररथ, मल्लखांब योगा, हेदेखील होणार आहेत. यात सामाजिक, धार्मिक, राष्ट्रभक्ती आणि दहशतवादासारख्या विविध विषयांवरील चित्ररथ असणार आहेत. गिरणगाव हे उत्सवाचे माहेरघर आहे. गिरणगावची सांस्कृतिक परंपरा व ऐक्य जतन करण्याचे काम आम्ही या शोभायात्रेतून करु, असे समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

Intro:गिरणगावातील यावर्षीही पाडवा मोठ्या जल्लोषात

मुंबई

लालबाग ,परळ व काळाचौकी या गिरणगाव विभागातील वैद्यकीय क्षेत्र, पोलीस विभाग व सामाजिक क्षेत्रातील महिलांना गिरणगाव सांस्कृतिक प्रतिष्ठान (लालबाग-परळ-काळाचौकी) ‘गिरणगावचा पाडवा’ या शोभायात्रेत भारतमातेच्या पालखीचा मान देण्यात येणार आहे. तसंच सामाजिक क्षेत्रात रुग्ण सेवा ईश्वर सेवा याप्रमाणे कार्यरत असणारी परळमधील ‘नाना पालकर रुग्ण सेवा समिती’ या संस्थेस ‘गिरणगावभूषण पुरस्कार’ देण्यात येणार आहे.

या शोभायात्रेत दुर्गवीर प्रतिष्ठान च्या महिलांचे दांडपट्टा सादरीकरण, स्वयंसिध्द महिला मंडळाचे पारंपारिक वेषभूषेतील मराठमोठ्या खेळाचे सादरीकरण, बालविकास मंडळ, काळेवाडी यांचे महिलांचे लेझीम पथक, नृत्यदर्शन नृत्यालयाचे कथ्थक सादरीकरण व बाईकस्वार महिलांचा स्त्रीशक्तीचा जागर हे या शोभायात्रेचे मुख्य आकर्षण असेल. टेकाडी ग्रामस्थ मंडळ, रत्नागिरी यांचे पालखी नृत्यदेखील असणार आहे.

हिंदू नववर्षानिमित्त समितीच्या वतीनं या भव्य शोभायात्रेचं आयोजन करण्यात येतं. यंदाही या शोभायात्रेचा शुभारंभ ढोल-ताशांच्या गजरात परळ येथील स्वामी समर्थ मठातून शनिवार ६ एप्रिल रोजी सकाळी ७ वा. होईल आणि शोभायात्रेचा समारोप चिंचपोकळी दक्षिण विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ (गिरणगावचा राजा) मुक्ता जयहिंद सिनेमागृह इथं होणार आहे.

या शोभायात्रेत श्री शिवराय चित्ररथ (गिरणगाव सांस्कृतिक प्रतिष्ठान), १५ फूट उंचीची भारतमातेची प्रतिमा (दुर्गामाता सार्वजनिक उत्सव मंडळ), देवभूमी महाराष्ट्र संस्कृती चित्ररथ (श्री परिवार, तेजुकाया), मल्लखांब योगा (ऋतुराज ॲकेडमी), आदी चित्ररथ सहभागी होणार आहेत. सामाजिक, धार्मिक, राष्ट्रभक्ती आणि दहशतवाद आदी विविध विषयांवरील चित्ररथ असणार आहेत. यावेळी श्री संप्रदाय, श्री सातारा समूह सहकारी संस्था, वारकरी संप्रदाय आदी धार्मिक संस्थाही या शोभयात्रेत सहभागी होतील.

शोभायात्रेत भारतमाता पालखीसह परळ येथील श्री स्वामी समर्थ मठातून सकाळी ७. वा. प्रारंभ हाईल. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, भारतमाता नाका, चिंचपोकळी दक्षिण विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ (गिरणगावचा राजा) मुक्ता जयहिंद सिनेमागृह समारोप होईल. गिरणगाव हे उत्सवाचे माहेरघर आहे, गिरणगावची सांस्कृतिक परंपरा व ऐक्य जतन करण्याचे काम आम्ही या शोभायात्रेतून करु असं समितीचे पदाधिकाऱ्यांनी यांनी सांगितलं.

ह्यासाठी बातमीसाठी मागील वर्षाची व्हिज्युअल क्लिप दिली आहे येईल लावता ती कारण याप्रकारे आयोजन,जल्लोष असतं

Body:।Conclusion:।
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.