मुंबई : Ganesh Visarjan २०२३ : 'बाप्पा'चं विसर्जन आज होत आहे. मुंबईत गणपती विसर्जन हा एक सोहळा असतो. अनेक सार्वजनिक गणपती मंडळांचे गणपती ढोल-ताशा, DJ, लेझिमच्या तालावर वाजत गाजत चौपाट्यांवर विसर्जनासाठी आणले जातात. हा विसर्जन सोहळा आपल्या डोळ्यात साठवण्यासाठी अनेक गणेशभक्त मुंबईच्या कानाकोपऱ्यातून गिरगाव चौपाटीवर येत असतात. पण, मुंबईत असे फार कमी लोक आहेत जे या भक्तिमय आणि उत्साहाच्या वातावरणात रंगीबेरंगी 'फुलांची उधळण' (Pushpa Vrushti) करतात. असाच एक अवलिया म्हणजे विनायक नेवगे.
गणपतीच्या मिरवणुकीवर फुलांचा वर्षाव : तुम्हाला कोणतंही विधायक काम करायचं असल्यास सर्वात मोठी अडचण असते ती आर्थिक. असं म्हणतात आपण कोणतंही सोंग घेवू शकतो पण पैशाचं सोंग घेता येत नाही. मुंबईतील एक सामान्य घरातील विनायक नेवगे मागची अनेक वर्षे अखंडपणे गणपतीच्या मिरवणुकीवर फुलांचा वर्षाव करत आहेत.
अडीच लाख रुपये 'बाप्पा'च्या सेवेसाठी : विनायक नेवगे यांनी सांगितलं की, आधी माझा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय होता. गणपती बाप्पाच्या आशीर्वादानं सर्वकाही व्यवस्थित सुरू होतं. वार्षिक कमाईतील ठराविक रक्कम बाजूला काढून विसर्जनासाठी जाणाऱ्या प्रत्येक गणपतीवर पुषावृष्टी करण्यास सुरुवात केली. आजही मी वार्षिक कमाईतील थोडा वाटा बाप्पाच्या सेवेसाठी बाजूला काढून ठेवतो. साधारण दरवर्षी अडीच लाख रुपये बाप्पाच्या सेवेसाठी बाजूला काढून ठेवतो.
तीनशे ते साडेतीनशे किलो फुलांची पुष्पवृष्टी : विनायक नेवगे हे गिरगाव चौपाटीच्या दिशेने जाणाऱ्या सर्व गणपतींवर पुष्पवृष्टी करतात. यात चिंचपोकळीचा चिंतामणी, लालबागचा राजा, मुंबईचा राजा यांसह अनेक मोठ्या आणि मानाच्या गणपतींचा समावेश असतो. या फुलांच्या वर्षावसाठी त्यांना दरवर्षी तीनशे ते साडेतीनशे किलो फुलांची गरज असल्याची माहिती विनायक यांनी दिली. आता विनायक यांनी 'मैत्री फाउंडेशन' या नावानं सामाजिक संस्था सुरू केली असून, ते या संस्थेमार्फत समाजपयोगी कार्यक्रम घेत असतात. विनायक यांनी सांगितले की, माझं काम बघून अनेकजण सोबत आले असून, इथला प्रत्येकजण त्यांच्या सोईनुसर मदत करतात. काहीजण मिरवणुकीत येणाऱ्या गणेश भक्तांना पाणी,नाष्टा देतात त्यामुळं या कामाला आणखी उंची आली आहे.
शिवराज्याभिषेक सोहळा : यावर्षी त्यांनी ऐतिहासिक वारसा लोकांसमोर ठेवण्याचं ठरवलंय. यासाठी त्यांनी शिवराज्याभिषेक सोहळा आणि शिवकालीन प्रात्यक्षिकांचं प्रदर्शन ठेवलंय. जेणेकरून आपला ऐतिहासिक वारसा इतरांना देखील माहिती होईल.
हेही वाचा -