ETV Bharat / state

Fugitive Accused Arrested: फरार आरोपीला 5 वर्षानंतर अटक; सिमकार्ड, नाव बदलवून पोलिसांची दिशाभूल

author img

By

Published : Jun 15, 2023, 10:30 PM IST

फिल्मसिटीमध्ये काम करणाऱ्या बडा कालू या मोठ्या गुन्हेगाराच्या हत्येचा प्रयत्न करून तब्बल ५ वर्षे फरार असलेल्या एका अट्टल गुन्हेगाराला जेरबंद करण्यात मुंबईच्या दिंडोशी पोलिसांना यश आले आहे. तांत्रिक तपासाच्या मदतीने आरोपीला जेरबंद केले गेले.

Fugitive Accused Arrested
फरार आरोपीला 5 वर्षानंतर अटक
मुंबई पोेलिसांची कामगिरी

मुंबई: आरोपी पोलिसांपासून पळून जाण्यासाठी तो दर महिन्याला मोबाईलचे सिमकार्ड बदलत असे. तसेच दरवेळी नाव बदलत असे. पोलिसांनी त्याला मद्रास येथून अटक केली आहे. आरोपी 17 जूनपर्यंत दिंडोशी पोलिसांच्या कोठडीत राहणार आहे.

वर्चस्वाच्या लढाईतून शत्रुत्व: दिंडोशी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जीवन खरात यांनी सांगितले की, अटक करण्यात आलेला आरोपी सतीश उर्फ ​​प्रशांत उर्फ ​​फरशी नरसैया बोमंडी (28) हा दिंडोशी हद्दीत राहत होता. तो फिल्मसिटीमध्ये मोल्डिंगच्या कामाचे कंत्राट घेत असे. फिल्मसिटीमध्ये काम करणाऱ्या बडा कालूशी त्याची ओळख झाली. दोघेही एकमेकांना ओळखत होते; पण वर्चस्वाची लढाई त्यांच्यात अशी झाली की, दोघेही एकमेकांच्या प्राणांचे शत्रू बनले होते.

जीवघेणा हल्ला: सुमारे पाच वर्षांपूर्वी जुन्या वैमनस्यातून 5 ऑक्टोबर रोजी बडा काळू व त्याचे साथीदार व धीरज गोरेगावकर व त्याचे साथीदार यांच्यात भांडण झाले होते. आपापल्या क्षेत्रात गुन्ह्यात सहभागी झाल्यामुळे दोघेही एकमेकांच्या जीवाचे रान झाले होते. दोघांमध्ये हाणामारी झाली.आरोपी फरशी याने बडा कालूवर चाकू आणि कोयत्याने जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात बडा कालू गंभीर जखमी झाला. पण त्याचा जीव वाचला. फरशीचे 4 साथीदार या लढाईत प्रथम पकडले गेले. मात्र, फरशीचा मास्टरमाइंड आरोपी फरार झाला. दिंडोशी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पीआय जीवन खरात, एपीआय अजित शंकर देसाई, पोलीस हवालदार यांनी तपास सुरू केला.

दोघांवरही गंभीर गुन्हे: बडा कालू व फरशी या दोन्ही गुन्हेगारांवर खुलेआम तलवारीचा वापर करून लुटमार, दरोडा व खंडणी, घरफोडी, हप्ते वसुलीसह सुमारे 25 गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे. नामदेव मायगधे, हेमंत सीताराम रोडे, सचिन कांबळे, सागर तामकर, विलास जाधव, अमित वायंगणकर शैलेंद्र भंडारी यांच्या पथकाने मिळून फरशीचा शोध घेतला. मात्र तो सापडला नाही. तब्बल ५ वर्षांनंतर पुन्हा शोध सुरू केला तेव्हा लक्षात आले की, गुन्हेगार इतका हुशार होता की, तो दर महिन्याला मोबाईलचे सिमकार्ड बदलून वापरत होता. एवढेच नाही तर नाव बदलून तो लपून बसायचा. मात्र पोलिसांच्या नजरेतून तो सुटू शकला नाही आणि तो पोलिसांच्या हाती लागला.

हेही वाचा:

  1. Saraswati Vaidya Murder Case : मनोज सानेला होती सेक्सची चटक; सरस्वतीच्या मृतदेहासोबत काढले होते नग्न फोटो
  2. Bike Thief Arrested: चोरांचा शौक 'लई भारी', फक्त 'याच' मॉडेलच्या गाड्या चोरायचे; अखेर अटक
  3. Mumbai Crime News: लोकलमध्येही महिला सुरक्षित नाही! लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला घटनेच्या 8 तासांनंतर अटक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.