मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची प्रकृती चिंताजनक आहे. काही दिवसांपूर्वी त्यांना ब्रेन हॅमरेज झाल्यामुळे शहरातील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज डॉक्टरांनी त्यांच्या प्रकृतीची अपडेत दिली आहे.
आयसीयूमध्ये उपचार सुरु : मनोहर जोशी यांचा मुलगा उन्मेश जोशी यांनी सांगितले की, त्यांचे वडील अजूनही बेशुद्ध आहेत. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी (85) यांना सोमवारी अर्ध कोमा अवस्थेत पी.डी. हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. हॉस्पिटलने एका निवेदनात म्हटले आहे की, 'मनोहर जोशींची प्रकृती गंभीर असून ते अर्धकोमात आहेत. त्यांचा मेंदूतील रक्तस्राव स्थिर आहे. ते अजूनही अतिदक्षता विभागात (ICU) आहेत. तेथे त्यांची वैद्यकीय व्यवस्था केली जात आहे आणि त्यांच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.'
उद्धव आणि रश्मी ठाकरे यांनी घेतली भेट : जोशी यांना 22 मे रोजी अर्धकोमा अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी ते स्वत:हून श्वास घेत होते आणि व्हेंटिलेटरवर नव्हते. त्यांचा मुलगा उन्मेष जोशी यांनी सांगितले की, त्यांचे वडील बेशुद्ध आहेत आणि त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी त्यांना थांबा आणि वाट पहा असे सांगितले आहे. ब्रेन हॅमरेजमुळे ते बेशुद्ध झाले आहेत, असे ते म्हणाले. शिवसेना (यूबीटी) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी मंगळवारी रुग्णालयात जाऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.
शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री होते : मार्च 1995 मध्ये राज्यात शिवसेना आणि भाजपच्या युतीची सत्ता आल्यावर मनोहर जोशी हे महाराष्ट्रातील शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री बनले होते. 1966 पासून ते शिवसेनेचे सदस्य आहेत. ते लोकसभा अध्यक्षही राहिले आहेत. तसेच त्यांनी मुंबईचे महापौर, महाराष्ट्र विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात केंद्रीय अवजड उद्योग मंत्री म्हणूनही काम केले आहे.
हेही वाचा :
- Manohar Joshi Admitted : माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी रुग्णालयात दाखल ; उद्धव ठाकरे हिंदूजा रुग्णालयात रवाना
- Arvind Kejriwal Met Uddhav Thackeray : आजपासून सत्ताधाऱ्यांना विरोधी म्हणा, उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल
- Uddhav Thackeray : राज्यात निवडणूक होणारच नाही; असे का म्हणाले उद्धव ठाकरे? घ्या जाणून...