ETV Bharat / state

उद्या ट्रॅक्टर रॅलीमधून शेतकरी मोदींचा माज उतरवतील - भाई जगताप

शेतकरी विरोधी काळे कायदे रद्द व्हावे यासाठी आमचे शेतकरी बांधव इतका मोठा लढा देत आहेत. पण, या मोदी सरकारला जाग येत नाही. मोदींना सत्तेचा माज आला आहे. पण मोदीजी, जो शेतकरी सगळ्यांचे पोट भरतो तोच शेतकरी तुमचा माज उतरवेल, अशी टीका मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी केंद्र सरकारवर केली.

Bhai Jagtap comment Narendra Modi
काँग्रेस भाई जगताप प्रतिक्रिया
author img

By

Published : Jan 25, 2021, 4:20 PM IST

मुंबई - शेतकरी विरोधी काळे कायदे रद्द व्हावे यासाठी आमचे शेतकरी बांधव इतका मोठा लढा देत आहेत. पण, या मोदी सरकारला जाग येत नाही. मोदींना सत्तेचा माज आला आहे. पण मोदीजी, जो शेतकरी सगळ्यांचे पोट भरतो तोच शेतकरी तुमचा माज उतरवेल. उद्या लाखोंच्या संख्येने शेतकऱ्यांची ट्रॅक्टर रॅली दिल्लीत धडकेल, तेव्हा मोदींचा माज नक्कीच उतरले, अशा शब्दात मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी केंद्र सरकारवर टीका केली.

हेही वाचा - राज्यपालांना कंगणाला भेटायला वेळ, पण शेतकऱ्यांसाठी वेळ नाही - शरद पवार

संघर्ष करावा लागेल आणि तो करणार

सिंधू बॉर्डरवर देशभरातील शेतकरी लढत आहेत. पण, केंद्राकडून हे आंदोलन केवळ पंजाबच्या शेतकऱ्यांचे आहे, असे भासवले जात आहे. असे आहे तर मग उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांवर का कारवाई केली जात आहे. तेव्हा मोदीजी तुम्ही कितीही खोटा भास निर्माण करा, हा शेतकरी आता तुम्हाला मातीत गाडल्याशिवाय राहणार नाही, असे भाई जगताप म्हणाले.

'तब लढे थे गोरोसे, अब लढेंगे भाजप के चोरोसे', असा नाराही यावेळी भाई जगताप यांनी दिला. जोपर्यंत कायदा रद्द होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहील आणि या आंदोलनात काँग्रेस शेतकऱ्यांच्या पाठीशी असेल असेही त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा - शेतकर्‍यांचे आंदोलन सुरू ठेवून प्रजासत्ताक दिनी देश अशांत ठेवायचाय का?

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.