ETV Bharat / state

एसटी चालकामळे मुलीचा पाय गमावला; कुटुंबियांची महामंडळाकडे पुर्नवसनाची मागणी

author img

By

Published : Feb 22, 2020, 11:21 AM IST

अकरावीमध्ये शिकणारी मोनाली नावाची तरुणी सातारा-कामेरी मार्गावर धावणाऱ्या बसमध्ये चढत असाताना, चालकाने निष्काळजीपणे गाडी चालवली. यात अनेकजण तोल जाऊन पडले. यावेळी मोनालीचा पाय चाकाखाली गेला होता.

satara st bus accident
मोनाली तानाजी कंठे

मुंबई - सातारा जिल्ह्यातील मिलिटरी अपशिंगे गावातील मोनाली तानाजी कंठे या तरुणीला एसटी चालकाच्या निष्काळजीपणामुळे पाय गमवावा लागला आहे. मोनालीला कायमच अपंगत्व आल्याने तिच्या घरच्यांनी तिला एसटी महामंडळात नोकरी देऊन तिचे पुनर्वसन करावे, अशी मागणी केली आहे.

एसटी चालकाचामळे मुलीचा पाय गमावला; कुुटुंबियांची महामंडळाकडे पुर्नवसनाची मागणी

हेही वाचा -

देवेंद्र फडणवींसाच्या भाग्यात 'हे' पद फारकाळ नाही.. भैय्याजी जोशींनी वर्तवले भविष्य

अकरावीमध्ये शिकणारी मोनाली नावाची तरुणी सातारा-कामेरी मार्गावर धावणाऱ्या बसमध्ये चढत असाताना, चालकाने निष्काळजीपणे गाडी चालवली. यात अनेकजण तोल जाऊन पडले. यावेळी मोनालीचा पाय चाकाखाली गेला. यानंतर एसटी महामंडळाने आपली चूक मान्य करुन तिच्या उपचारासाठी यशवंत रुग्णालयामध्ये अनामत रक्कम देखील भरले होते. परंतु, पुढील खर्चाचे पैसे द्यायला उशीर केल्यामुळे दवाखान्याने उपचार करणे बंद केले आणि त्यामुळे तिच्या पायाला गँगरिन झाल्याने तिचा पाय काढावा लागला आहे, असा आरोप मोनालीच्या पालकांनी केला आहे.

याबाबत एसटी महामंडळाशी संपर्क साधला असता, पालकांनी केलेला आरोप चुकीचा आहे. उलट आम्ही त्यांच्याशी संपर्क केला असता, त्यांनी मुंबईत आल्यावर फोन घेतले नाही. त्यांनी संपूर्ण वैद्यकीय खर्च देणार असल्याचे सांगितले होते. नुकताच मोनालीला मुंबईतील रहेजा हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

याबाबत परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांना मुलीच्या पुर्नवसनाबाबत विचारले असता, याबाबत माहिती नसून माहिती घेण्यात येईल असे त्यांनी सांगितले.

हेही वाचा -

उद्धव ठाकरेंचा दिल्ली दौरा : पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शाह, सोनिया गांधी अन् अडवाणींची घेतली भेट

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.