ETV Bharat / state

Mumbai Crime News: हॉटेलच्या मॅनेजरला चाकूचा धाक दाखवून केली खंडणीची मागणी, आरोपीस अटक - वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर कुडाळकर

दहिसर पश्चिम येथे असलेल्या जॉय अँड जॉय या हॉटेलमध्ये गुंड प्रवृत्तीच्या गंगा कुंची कुर्वे या आरोपीने त्याच्या इतर साथीदारांसोबत बेकायदेशीररित्या प्रवेश केला. त्यांनी चाकूचा धाक दाखवून दोन लाख रुपयांची खंडणी आणि फुकटात दारूची मागणी केली. या मागणीस हॉटेलच्या मॅनेजरने नकार दिल्याने गुंडाने मॅनेजरला शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी एमएचबी कॉलनी पोलिसांनी आरोपीला अटक केली.

Mumbai Crime
खंडणीची मागणी करणाऱ्या आरोपीस अटक
author img

By

Published : Jun 6, 2023, 10:48 PM IST

मुंबई : शहरात गुन्हेगारीचा आलेख वाढला आहे. तक्रारदार यांनी एमएचबी कॉलनी पोलीस ठाण्यास तक्रार दिली की, 2 जूनला रात्री 12.30 वाजताच्या सुमारास दहीसर पश्चिम परीसरातील गंगा कुंची कुर्वे नावाचा गुंड प्रवृत्तीच्या ईसमाने तक्रारदार हे मॅनेजर म्हणुन काम करत असलेल्या जॉय अँड जॉय हॉटेलमध्ये त्याच्या दोन साथीदारांसोबत प्रवेश करुन सोबत आणलेल्या चाकूचा धाक दाखवून दोन लाख रुपयांची खंडणी व फुकट दारुची मागणी केली. त्यास तक्रारदार यांनी नकार दिला म्हणून, यातील आरोपी यांनी तक्रारदार यांना शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी एमएचबी कॉलनी पोलीस ठाण्यात हॉटेलच्या मॅनेजरने तक्रार दाखल केली होती. त्यानंतर आरोपी गंगा कुंची कुर्वे याला एमएचबी कॉलनी पोलिसांनी अटक केली आहे.

गंभीर गुन्हे दाखल : या हकीकतीवरुन यातील आरोपी विरुद्ध एम.एच.बी.कॉलनी पोलीस ठाण्यात भारतीय दंड संविधान कलम 387, 506 (2), 504, 34 सह कलम 37(1)/135 महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तसेच आरोपी गंगा कुंची कुर्वे याचा पूर्व गुन्हेगारी इतिहास पाहिला असता आरोपीवर यापुर्वी 2009 मध्ये भारतीय दंड संविधान क- 324, 506(2), 504, 34, 2011 मध्ये भारतीय दंड संविधान कलम 324, 323, 504, 506 (2) व भारतीय दंड संविधान कलम 324, 504, 34 आणि भारतीय दंड संविधान कलम 326, 504, 34 तसेच 2012 मध्ये भारतीय दंड संविधान कलम 342, 452, 506 (2), 34 आणि भारतीय दंड संविधान कलम 302, 141, 143, 147, 149 व भारतीय दंड संविधान कलम 323,427,506 (2), 504,34 इतके गुन्हे दाखल आहेत.

याबाबत आधिक तपास सुरू: तसेच 2022 मध्ये कलम 394, 324, 323, 504, 506(2),34 अन्वये गंभीर गुन्हे दाखल आहेत. तसेच आरोपी याचेकडे अधिक तपास करुन त्याने अशा प्रकारचे गुन्हे केले आहेत, काय याबाबत तपास करत आहोत, अशी माहिती एमएचबी कॉलनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर कुडाळकर यांनी दिली आहे.

हेही वाचा -

  1. Nashik ACB Action मनपा शिक्षण अधिकारी धनगर लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात
  2. Nashik Crime लाचखोर अधिकारी सुनिता धनगरच्या घरी एसीबीला सापडली 85 लाखांची रोकड अन् 32 तोळे सोने
  3. Extortion Demand by Blackmailing छत्रपती संभाजीनगरमध्ये केली जात आहे उद्योजकांकडून खंडणीची मागणी उद्योग टिकवण्याचे आव्हान

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.