ETV Bharat / state

Maharashtra Ministry Expansion : राज्यात लवकरच होणार मंत्रिमंडळाचा विस्तार, जाणून घ्या कोणाच्या गळ्यात पडणार मंत्रिपदाची माळ - मंत्रिमंडळ विस्तार

राज्यात लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची चर्चा सुरू आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शुक्रवारी रात्री मंत्रिमंडळाच्या विस्तारावर चर्चा करण्यासाठी दिल्लीला गेले होते. यानंतर काही आमदारांनी मंत्री पदासाठी जोरदार लॉबिंग सुरू केली आहे.

Maharashtra Ministry Expansion
संपादित छायाचित्र
author img

By

Published : May 20, 2023, 12:11 PM IST

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या सत्ता संघर्षाच्या निकालानंतर राज्यातील शिंदे फडणवीस सरकार स्थिर राहणार असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे आता राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराला कोणतीही अडचण राहिलेली नाही. निकाल लागल्यानंतर लगेचच मंत्रिमंडळ विस्तार होईल, अशी चर्चा होती. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा हे मुंबई आणि महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येऊन गेल्यानंतर या घडामोडींना आता वेग आला आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अचानक दिल्लीवारी : सत्ता संघर्षाच्या निकालानंतर आपल्या सरकारला कोणताही धोका नाही. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालावर आपण समाधानी असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते. त्यामुळे राज्यातील सरकार आता स्थिर असून मंत्रिमंडळ विस्ताराला कोणतीही अडचण येणार नाही असे संकेतही त्यांनी दिले होते. दरम्यान उपमुख्यमंत्री नागपूर दौऱ्यावर असताना अचानक शुक्रवारी रात्री दिल्ली दरबारी पोहोचले. रात्रीच्या बैठकीनंतर ते पुन्हा नागपुरात परतले आहेत. मात्र या घडामोडी आणि बैठकांमुळे मंत्रिमंडळाचा विस्तार पुढील आठवड्यात होण्यावर जवळपास शिक्कामोर्तब झाले आहे.

आमदार बच्चू कडू यांनी दिले संकेत : आमदार बच्चू कडू यांनी मंत्रिमंडळ विस्तार होण्याचे संकेत नुकतेच दिले होते. आता राज्यातील सरकारला कोणताही धोका नाही, त्यामुळे मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा सुरू झाली आहे. कदाचित 21 मे रोजी मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकतो अशी शक्यता बच्चू कडू यांनी वर्तवली होती. आमदार बच्चू कडू हे प्रहार पक्षाचे नेते असून त्यांनी शिंदे फडणवीस सरकारला पाठिंबा दिला आहे. त्यांच्याच आग्रहानुसार राज्यात नवीन दिव्यांग मंत्रालय सुरू करण्यात आले आहे. बच्चू कडू यांना दिव्यांग मंत्रालयाची जबाबदारी सोपवली जाईल अशी शक्यता वाटत असताना त्यांना मंत्रिपद दिले गेले नव्हते. मात्र आता नव्या मंत्रिमंडळ विस्तारात बच्चू कडू यांच्याकडे दिव्यांग मंत्रालयाची जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता आहे.

काय आहे विस्ताराची तारीख : मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख बच्चू कडू यांनी जरी 21 मे सांगितले होते. मात्र 21 मे रोजी मंत्रिमंडळ विस्तार न होता, तो आता पुढील आठवड्यात होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. पुढील आठवड्यातील 23 किंवा 24 तारखेला मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आता मंत्रिमंडळ विस्ताराची नवी तारीख समोर आली असून दोन्ही पक्षातील इच्छुकांनी मंत्रीपदासाठी जोरदार लॉबिग करायला सुरुवात केली आहे.

शिंदे गटातून कोण इच्छुक

  1. प्रताप सरनाईक
  2. भरत गोगावले
  3. राजेंद्र यड्रावकर
  4. संजय शिरसाट
  5. बालाजी किनीकर
  6. सदा सरवणकर
  7. अनिल बाबर
  8. यामिनी जाधव
  9. चिमणराव पाटील

भारतीय जनता पक्षातून इच्छुक

  1. प्रवीण दरेकर
  2. संजय कुटे
  3. योगेश सागर
  4. देवयानी फरांदे
  5. मनीषा चौधरी
  6. बच्चू कडू

या आमदारांच्या गळ्यात पडणार मंत्रिपदाची माळ : बच्चू कडू यांच्याकडे दिव्यांग मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्याचा सरकारचा विचार आहे. तर भरत गोगावले यांच्याकडे जलसंधारण विभागाची जबाबदारी सोपवण्याची चर्चा सुरू आहे. मंत्री पदासाठी अतिशय उत्सुक असलेल्या औरंगाबादचे आमदार संजय शिरसाट यांच्याकडे परिवहन मंत्रालयाची जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता आहे.

हेही वाचा -

  1. KCR On BRS Model In Country : विकासाचे बीआरएस मॉडेल भारतभर नेणार; बीआरएसने सुरू केली 288 मतदार संघात लढण्याची तयारी - केसीआर
  2. Raj Thackeray On Narendra Modi : हिंदू धर्म इतर धर्मीयांमुळे भ्रष्ट होणारा नाही, नोट बंदीची धरसोडवृत्ती चांगली नाही; राज ठाकरेंचा नरेंद्र मोदींवर हल्लाबोल
  3. Maharashtra Ministry Expansion : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तातडीने दिल्ली दरबारी, मंत्रिमंडळाच्या विस्ताराला हिरवा कंदील ?

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.