मुंबई - राज्यातील सर्व विद्यापीठामध्ये होणाऱ्या उन्हाळी परीक्षाविषयी ( Exams Fever 2022 ) राज्याचे उच्च व शिक्षण मंत्री उदय सामंत ( Minister Uday Samant ) यांच्याबरोबर कुलगुरुंची ऑनलाइन बैठक झाली असून यामध्ये विद्यापीठाच्या परीक्षा ऑफलाइन घेण्याचा निर्णय कुलगुरुच्या हवाली सोडण्यात आल्याने विद्यार्थ्यांमध्ये परत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. तर दुसरीकडे विद्यार्थ्यांच्या ऑफलाइन परीक्षेसाठी विरोधही सुरू झाला आहे.
कुलगुरुंनी निर्णयावर बोलणं योग्य नाही - उच्च व शिक्षण मंत्री उदय सामंत आज प्रसार माध्यमाशी बोलताना म्हणाले, कोरोना पार्श्वभूमीवर परीक्षा रद्द झाले पाहिजे यासाठी विद्यार्थी व विद्यार्थ्यांच्या पालकांची मागणी उचलून धरण्यात आली. ऑनलाइन परीक्षा ( Online Exams ) घेण्याच्या बाबतीतही आम्ही निर्णय घेतला होता. तोही पूर्ण करून दाखविला. पण, आता कोरोना बाजूला झालेला आहे. आता विद्यार्थ्यांनी ऑफलाइन परीक्षेसाठी सज्ज राहिले पाहिजे. ऑफलाइन परीक्षेच्या ( Offline Exams ) मुद्द्यांवर आजच कुलगुरुंशी बैठक झाली. त्यामध्ये सगळ्याच कुलगुरुंनी एकमताने मागणी केली आहे की विद्यापीठाच्या परीक्षा ऑफलाइन घेण्यात यावी. त्यामुळे विद्यापीठाच्या कुलगुरुंनी निर्णय घेतल्यानंतर त्यावर बोलणे योग्य नसल्याचे ते सांमत यांनी सांगितले.
परीक्षेचा वेळ वाढवण्याचा निर्णय - ऑफलाइन परीक्षेची कुलगुरुंची भूमिका आहे. तसेच विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या व त्यांच्या अडचणी कुलगुरुकडे मांडले पाहिजे. जर कुलगुरुंनी शासनाला सांगितले की, परीक्षा स्थितीनुसार घ्यावे लागतील. त्यामागे आमचा नकार घेण्याचे कोणतेही कारण राहणार नाही. आजच्या बैठकीत चांगल्या पद्धतीने ऑफलाइन परीक्षा कसे घेण्यात येतील यासाठी बैठक घेतली. त्यात चार मुद्दे समोर आले. त्यात विद्यार्थ्यांची मागणी होती की, त्यात ऑफलाइन परीक्षा घेत असताना पहिल्या आणि दुसऱ्या पेपरमध्ये कालावधी असला पाहिजे. त्यामुळे दोन दिवसाचा कालावधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर तासाला पंधरा मिनीटे वाढविण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती ही उदय सामंत यांनी दिली आहे.
हेही वाचा - Saamana Editorial: समस्त भाजप नाच्या पोरांसारखा त्या बाईच्या इशाऱ्यावर नाचतो हे आश्चर्यच