बारावीच्या परीक्षेत कोकण विभाग अव्वल, यंदाही मुलींनीच मारली बाजी
मुंबई - महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल आज सकाळी ११ वाजता जाहीर करण्यात आला. दरवर्षीप्रमाणे यंदाही मुलींनी निकालात बाजी मारली. यंदा राज्याचा निकाल ८५.८८ टक्के लागला असून गेल्यावर्षीपेक्षा २.५३ टक्क्यांनी घसरला आहे. यामध्ये कोकण विभागाने बाजी मारली असून नागपूर विभाग पिछाडीवर आहे. याबाबत बोर्डाच्या अध्यक्षा शकुंतला काळे यांनी पत्रकारपरिषदेत माहिती दिली. वाचा सविस्तर...
डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरण : नायर रुग्णालयातील स्त्रीरोग विभागाचे प्रमुख निलंबित
मुंबई - पायल तडवी आत्महत्याप्रकरणी नायर रुग्णालयाच्या स्त्रीरोग विभागाच्या प्रमुखांना निलंबित करण्यात आले आहे. डॉ. पायल तडवीने गेल्या २२ मे'ला ३ वरिष्ठ डॉक्टरकडून होणाऱ्या रॅगिंगच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली होती. वाचा सविस्तर...
खासदार सुजय विखेंसह सदाशिव लोखंडेंच्या अभिनंदनाचे फ्लेक्स फाडले; युतीचे कार्यकर्ते संतप्त
अहमदनगर - नवनिर्वाचित खासदार सदाशिव लोखंडे आणि खासदार सुजय विखे-पाटील यांच्या अभिनंदनाचे फ्लेक्स बोर्ड अज्ञात व्यक्तीने फाडले. संगमनेरलगत असलेल्या घुलेवाडी येथे सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली. त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. वाचा सविस्तर...
तारापूर औद्योगिक क्षेत्रातील 'वर्षा ऑर्गेनिक' या रासायनिक कारखान्यात भीषण स्फोट; 2 कामगार गंभीर
पालघर - तारापूर औद्योगिक क्षेत्रातील वर्षा आँर्गेनिक या रासायनिक कारखान्यात भीषण स्फोट झाला आहे. या स्फोटाची दाहकता इतकी तीव्र होती की, औद्योगिक वसाहतीच्या आसपासचा सुमारे 5 किलोमीटर परिसर यामुळे हादरला. या स्फोटात दोन कामगार जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. जखमींची प्रकृती गंभीर असल्याने दोन्ही कामगारांना उपचारासाठी मुंबई येथील रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. वाचा सविस्तर...
खासदार झाले म्हणजे पंख लागले का? काँग्रेस नगरसेवकाचा जलील यांना टोला
औरंगाबाद - खासदार इम्तियाज जलील यांनी नाव न घेता बेगमपुरा भागात काँग्रेसचे नगरसेवक पत्त्याचा क्लब चालवत असल्याचा आरोप केला होता. यावर काँग्रेस नगरसेवक अफसर खान यांनी एक व्हिडिओ प्रसारित केला आहे. त्यामध्ये त्यांनी खासदार झाले म्हणजे पंख लागले का? तु काय माझ्याकडे येतो, तु सांग कुठे येऊ असे आव्हान खासदार जलील यांना दिले आहे. लवकरच पत्रकार परिषद घेऊन खासदार जलील यांनी केलेला गैरप्रकार समोर आणणार असल्याचेही अफसरखान यांनी सांगितले. वाचा सविस्तर...