ETV Bharat / state

MAHA CORONA LIVE : राज्यात आज १,२७८ नव्या रुग्णांची नोंद; एकूण कोरोना रुग्णांची संख्या पोहोचली २२,१७१वर.. - कोरोना विषाणू

Corona Update
कोरोना अपडेट
author img

By

Published : May 10, 2020, 10:12 AM IST

Updated : May 10, 2020, 9:51 PM IST

21:47 May 10

राज्यात आज १,२७८ नव्या रुग्णांची नोंद; एकूण कोरोना रुग्णांची संख्या पोहोचली २२,१७१वर..

मुंबई - राज्यात आज दिवसभरात १,२७८ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली. त्यामुळे राज्यातील एकूण रुग्णांची संख्या २२,१७१वर पोहोचली आहे. तसेच, आज झालेल्या ५३ मृत्यूंनंतर आता राज्यातील एकूण कोरोनाच्या बळींची संख्या ८३२ झाली आहे.

20:01 May 10

पुण्यात आज कोरनामुळे एका 13 महिन्यांच्या बाळासह 3 जणांचा मृत्यू, आतापर्यंत 151 जण दगावले

19:56 May 10

मुंबईमध्ये आज नवीन 875 कोरोनाबाधितांची भर, एकूण रुग्णांचा आकडा 13 हजार 564

मुंबईमध्ये आज नवीन 875 कोरोनाबाधितांची भर

19:51 May 10

पुण्यात कंटेटमेंट झोनमध्ये दवाखाने वगळता इतर सर्व दुकाने 17 मे पर्यंत बंद, मनपा आयुक्तांचा आदेश

19:43 May 10

सोलापुरात आज आढळले कोरोनाचे 48 रुग्ण, एकूण बाधितांचा आकडा 264

19:43 May 10

नांदेडमध्ये आज 6 कोरोनाबाधितांची भर, एकूण रुग्णांचा आकडा 51 वर

नांदेड - दिवसेंदिवस नांदेडमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. आज (रविवार) आणखी 6 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. ते एनआरआय यात्री निवासमध्ये होते. 6 पैकी एक ठाण्याचा, 2 पंजाबमधील आणि 3 उत्तर प्रदेशमधील असल्याची माहिती मिळते आहे. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 51 झाली आहे. तर 5 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

19:42 May 10

आर्थर रोड कारागृहातील आणखी 81 कैद्यांना कोरोनाची लागण, एकूण रुग्णांची संख्या 184 वर

16:36 May 10

भायखळा महिला कारागृहातही कोरोनाचा शिरकाव, एक महिला कैदी बाधित

मुंबई - येथील आर्थर रोड कारागृहात 77 कैदी व 26 कारागृह कर्मचारी कोरोनाग्रस्त आढळल्यानंतर या सर्वांना उपचारासाठी कारागृहाबाहेर हलविण्यात होते. त्यानंतर आता मुंबईतील भायखळा येथील महिला कारागृहात एका 54 वर्षीय महिला कैद्याचाही कोरोना अहवाल पॉजिटिव्ह आल्यामुळे पुन्हा एकदा चिंता व्यक्त केली जात आहे.

15:36 May 10

'गो.. गो.. गो.. कोरोना’ : बुलडाणा जिल्हा कोरोनामुक्त, आतापर्यंत सर्व २३ रूग्णांना डिस्चार्ज

15:30 May 10

उरणमध्ये एकाच कुटुंबातील 21 जणांना कोरोनाची लागण

रायगड - उरण तालुक्यात एकाच कुटुंबातील 21 जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता 234 वर पोहचली आहे. करंजा गावातील हे कुटुंब आहे. या 21 पैकी 15 जणांना नवी मुंबईच्या एमजीएम कामोठे येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. रायगड जिल्ह्यातील कोरोनारुग्णांची वाढती संख्या पाहता जिल्ह्याची वाटचाल रेड झोनकडे होताना दिसत आहे.

12:44 May 10

औरंगाबादेत कोरोनाचे 38 नवे रुग्ण, एका रुग्णाचा मृत्यू

औरंगाबाद - जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. रविवारी सकाळी आलेल्या अहवालात 38 रुग्णांचे कोरोना चाचणीचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. या 38 नव्या रुग्णांसह जिल्ह्यातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 546 वर पोहचली आहे. तसेच कोरोनामुळे एका 50 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 13 वर पोहचला आहे.

12:01 May 10

धुळ्याच्या रुग्णालयातून कोरोनाबाधित रुग्ण पळाला.. अमळनेरपर्यंत धक्कादायक प्रवास

धुळे- अमळनेर येथील संभाव्य कोरोनाबाधिताची धुळ्यात कोरोना तपासणी करण्यात आल्यानंतर हा तरुण पॉझिटिव्ह असल्याचे तपासणी अहवालात निष्पन्न झाले. मात्र, या कोरोनाबाधिताने रात्रीच धुळ्याच्या हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वार्ड मधून पळ काढला. या घटनेची माहिती समजताच आरोग्य यंत्रणा पुर्णतः हादरली आहे. अमळनेरच्या कोरोनाबधिताचा शोध घेतला असता हा रुग्ण त्याच्या मूळगावी अमळनेरमध्ये पोहोचल्याची धक्कादायक माहिती समोर आली.

12:01 May 10

राज्यात 786 पोलिसांना कोरोनाची लागण; 7 जणांचा मृत्यू

मुंबई - कोरोनाविरोधात पोलीस आणि आरोग्य यंत्रणा दिवसरात्र काम करत आहेत. मात्र, हे करताना त्यांच्या स्वत:चा जीव धोक्यात आहे. राज्य पोलीस दलातील 786 पोलिसांना कोरोनाची लागण झाली असून यात 88 पोलीस अधिकारी आणि 698 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. आत्तापर्यंत मुंबईत 4, पुणे, सोलापूर, नाशिक येथे प्रत्येकी एक अशा एकूण 7 पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे.

10:04 May 10

औरंगाबादकरांची चिंता वाढली, कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या 500 च्या वर

औरंगाबाद - राज्यात दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. मुंबई, पुणे, ठाणे परिसरासह औरंगाबादमध्येही कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असल्याचे दिसत आहे. औरंगाबादमध्ये कोरोनाग्रस्तांच्या रुग्ण संख्येने पाचशेचा आकडा पार केला आहे. शनिवार दिवसभरात औरंगाबादमध्ये कोरोनाचे 27 रुग्ण आढळून आले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या 508 वर पोहोचली आहे.

10:03 May 10

रत्नागिरी जिल्ह्याची चिंता वाढली, कोरोनाग्रस्तांची संख्या 34 वर

रत्नागिरी - जिल्ह्याची चिंता आणखी वाढली आहे. शनिवारी एकाच दिवशी जिल्ह्यात तब्बल 13 कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. एकाच दिवशी एवढे रुग्ण सापडण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्ण संख्या 34 वर पोहोचली आहे. यातील अ‌ॅक्टिव्ह रुग्ण 28 आहेत.

10:03 May 10

मुंबईत आणखी एका पोलिसाचा कोरोनामुळे बळी, राज्यात पोलिसांच्या मृत्यूचा आकडा 7 वर

मुंबई - येथाल विनोभा भावे नगर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका सहायक फौजदाराचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.

09:44 May 10

मुंबई - राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 20 हजार 228 झाली आहे. शनिवारी 1 हजार 165 नवीन रुग्णांचे निदान झाले. तर 330 कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून, आतापर्यंत राज्यभरात 3 हजार 800 रुग्ण बरे झाले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

Last Updated : May 10, 2020, 9:51 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.