ETV Bharat / state

Legislative Council Elections : विधानपरिषदेच्या पाच जागांसाठी जानेवारीअखेर निवडणूक; सर्वच पक्षांची मोर्चेबांधणी सुरू - विधानपरिषदेच्या पाच जागांसाठी जानेवारीअखेर निवडणूक

फेब्रुवारी २०२३ मध्ये रिक्त होणाऱ्या विधानपरिषदेच्या पाच जागांसाठी जानेवारीच्या २०२३ दुसऱ्या आठवड्यात निवडणूक जाहीर होणार असल्याची माहिती निवडणूक अधिकारी पारकर ( Electoral Officer Parker ) यांनी दिली. या निवडणूकीसाठी आता सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली असली तरी सत्ताधारी गटाचे पारडे जड असेल असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. ( Andheri byelection )

Legislative Council Elections
विधानपरिषद निवडणूक
author img

By

Published : Nov 25, 2022, 8:01 AM IST

मुंबई : अंधेरी पोटनिवडणूकीनंतर ( Andheri byelection ) आता राज्यात पुन्हा एकदा निवडणूकीचे वातावरण तयार होणार आहे. विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातील पाच जागांची निवडणूक दोन महिन्यांनंतर होणार आहे. याची तयारी सुरू असल्याची माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली आहे.

कोणते आहेत मतदारसंघ ? नाशिक पदवीधर मतदार संघातून काँग्रेसचे डॉ. सुधीर तांबे आणि अमरावतीमधून भाजपाचे डॉ. रणजित पाटील हे ७ फेब्रुवारी रोजी निवृत्त होणार आहेत. तर नागपूर शिक्षक मतदार संघातून भाजपा पुरस्कृत ना. गो. गाणार, औरंगाबादमधून राष्ट्रवादीचे विक्रम काळे आणि कोकण शिक्षक मतदार संघातुन शेतकरी कामगार पक्षाचे बाळाराम पाटील यांच्यासुद्धा विधानपरिषद सदस्यत्वाची मुदत ७ फेब्रुवारी रोजी सपंणार आहे. या पाचही सदस्यांना मागील अधिवेशनात निरोप देण्यात आला आहे. आता या पाचही मतदार संघांसाठी निवडणूक जाहीर होणार असल्यामुळे मतदार नोंदणी अखेरच्या टप्प्यात आली असल्याची माहिती पारकर यांनी दिली.

विवेक भावसार

कोणत्या विभागात किती मतदार ? नाशिक पदवीधर मतदार संघात नंदुरबार, धुळे, नाशिक, अहमदनगर आणि जळगाव जिल्ह्याचा समावेश आहे. या मतदार संघात बुधवार अखेर १ लाख ५५ हजार ३२० मतदारांची नोंदणी झाली आहे. अमरावती पदवीधर मतदारसंघात बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ आणि वाशीम जिल्ह्याचा समावेश आहे. तेथे १ लाख २५ हजार ९२४ मतदारांची नोंदणी झाली आहे. औरंगाबाद शिक्षक मतदार संघात नांदेड, बीड, उस्मानाबाद, हिंगोली, परभणी, औरंगाबाद, लातूर, जालना जिल्ह्याचा समावेश असून त्या मतदार संघात ५४ हजार ४१३ मतदार नोंदले आहेत. मागील वेळी येथे ५८ हजार ४१० मतदार नोंदवले गेले होते.

विदर्भ कोकणात काय आहे स्थिती ? नागपूर शिक्षक मतदार संघात वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यांचा समावेश आहे. तेथे ३३ हजार ५०२ मतदारांची नोंदणी झाली आहे. गत वेळेस ३५ हजार ९ मतांची संख्या होती. कोकण विभागात ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पालघर जिल्ह्यांचा समावेश आहे. या मतदार संघात ३० हजार १६२ मतदार नोंदणी झाली असून गतवेळेस ३७ हजार ६०४ मतदार नोंदले गेले होते. मतदार नोंदणीसाठी अद्याप एक महिना शिल्लक असल्यामुळे मतदार संख्येत आणखी भर पडेल, असा दावा निवडणूक अधिकारी मनोहर पारकर यांनी केला आहे.

भाजप मारणार बाजी : विधान परिषदेच्या या पाच जागांच्या निवडणुकीसाठी आणखी दीड ते दोन महिन्याचा कालावधी असला तरी भाजपा, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने या निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. या पाचही जागांवर भाजपचा दावा असल्यामुळे शिंदे गटाला एकही जागा मिळण्याची शक्यता नाही. या पाच पैकी एक जागा राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे जाण्याची शक्यता आहे. मात्र, अन्य जागांवर भाजपचा विजय होण्याची शक्यता ज्येष्ठ राजकीय विश्लेषक विवेक भावसार यांनी व्यक्त केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.