ETV Bharat / state

ED raids in Mumbai :  आयआरएस अधिकारी सचिन सावंतच्या घरी ईडीचे छापे, कारवाईनंतर सीबीआयकडून अटक, 500 कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी कारवाई - 500 crore scam case

ईडीने मंगळवारी रात्री सीमाशुल्क आणि जीएसटी संवर्गाचे अतिरिक्त आयुक्त सचिन सावंत यांच्या घरावर छापा टाकला. मंगळवारी मध्यरात्रीपर्यंत ईडीची शोध मोहीम चालू होती. सचिन सावंत हे यापूर्वी ईडीच्या मुंबई विभागात कार्यरत होते. दरम्यान सीबीआयने सचिन सावंत यांच्याविरोधात गुन्हा नोंदवत त्यांना अटक केली आहे.

ईडीची छापेमारी
ईडीची छापेमारी
author img

By

Published : Jun 28, 2023, 9:50 AM IST

Updated : Jun 28, 2023, 10:11 AM IST

मुंबई : वरिष्ठ आयआरएस अधिकारी सचिन सावंत यांना सीबीआयने 500 कोटींच्या घोटाळ्याप्रकरणात गुन्हा नोंदवत अटक केली आहे. दरम्यान काल मंगळवारी अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडीने सचिन सावंत यांच्या घरावर छापा टाकला होता. सचिन सावंत हे सध्या सीमाशुल्क आणि अप्रत्यक्ष कर संवर्गात अतिरिक्त आयुक्त म्हणून कार्यरत आहेत. बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी ईडीने आयआरएस अधिकारी सचिन सावंत यांच्या घरावर छापा टाकला होता. मंगळवारी मध्यरात्रीपर्यंत ईडीची शोध मोहीम चालू होती. दरम्यान सचिन सावंत यांच्या नातेवाईकांच्या घरावरही मंगळवारच्या रात्री ईडीने छापा टाकला.

का टाकला छापा : सचिन सावंत हे यापूर्वी ईडीच्या मुंबई विभागात कार्यरत होते. सचिन सावंत सध्या सीमाशुल्क आणि जीएसटी संवर्गाचे अतिरिक्त आयुक्त म्हणून कार्यरत आहेत. सीबीआयने अधिकाऱ्याविरुद्ध नोंदवलेल्या बेहिशोबी मालमत्तेच्या गुन्ह्याच्या आधारे हा छापा टाकण्यात आला आहे. सचिन सावंत हे ईडी मुंबई झोन 2 मध्ये उपसंचालक म्हणून काम करत होते. त्यावेळी त्यांनी एका बेहिशोबी मालमत्तेच्या प्रकरणाची चौकशी केली होती.

सावंत यांच्याविरोधात गुन्हा दाखल : ईडीने सीमाशुल्क आणि अप्रत्यक्ष कर संवर्गात कार्यरत असलेल्या आयआरएस अधिकाऱ्याच्या निवासस्थानी सकाळी छापा टाकला. आयआरएस अधिकारी सचिन सावंत भ्रष्टाचार आणि बेहिशोबी मालमत्ता प्रकरणाच्या चौकशीचे हा एक भाग होते. ईडीच्या अधिकाऱ्यांनी सावंत यांच्या नातेवाईकांच्या घरांचीही झडती घेतली आहे. सचिन सावंत यांनी यापूर्वी ईडी मुंबई झोन 2 मध्ये उपसंचालक म्हणून काम केले होते. यांनी काही हिरे कंपन्यांद्वारे बेकायदेशीरपणे 500 कोटींहून अधिक रक्कम आपल्या खात्यातून वळवली होती. याप्रकरणाची सचिन सावंत यांनी चौकशी केली होती.

काय आहे प्रकरण?अटक करण्यात आलेल्या एका आरोपीने सचिन सावंत यांच्याविरोधात फिर्याद दिली होती. या तक्रारीमुळे केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI) ने सावंत यांच्याविरोधात गुन्हा नोंदवला. दरम्यान मंगळवारी ईडीने सचिन सावंत यांच्या निवासस्थानासह मुंबईतील विविध ठिकाणी छापे टाकले. सध्या सावंत यांच्याकडे सीमाशुल्क आणि अप्रत्यक्ष कर विभागात अतिरिक्त आयुक्त पद आहे. या प्रकरणी मध्यरात्रीपर्यंत शोधमोहीम सुरू होती.

हेही वाचा

  1. Money Laundering Case : सुपरटेकचे संचालक आरके अरोरा यांना मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीकडून अटक
  2. ED Probe Sangli : तब्बल 53 तासानंतर 'त्या' खात्यांची ईडीकडून चौकशी पूर्ण, ईडीच्या रडारवर कोण ?

Last Updated : Jun 28, 2023, 10:11 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.