ETV Bharat / state

कोरोनाबाबत दक्षता घेत मुंबईत होळीनिमित्त होणाऱ्या पार्ट्या रद्द - mumbai holi party

कोरोना विषाणूमुळे व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष हिरेन शहा यांनी व त्यांच्या आयोजकांनी होळी निमित्त आयोजित केलेल्या पार्ट्या रद्द केल्याची माहिती दिली आहे.

holi corona
कोरोनो रोगाची दक्षता घेत मुंबईतील होळीनिमित्त होणाऱ्या पार्ट्या रद्द
author img

By

Published : Mar 7, 2020, 11:44 PM IST

मुंबई - होळी म्हणजे रंगांचा सण. भारतात वेगवेगळ्या भागात फाल्गुन पौर्णिमेला मोठ्या उत्साहात आणि आनंदात होळी साजरी केली जाते. होळी निमित्ताने मोठ्या पार्ट्यांचे आयोजन केले जाते यंदादेखील या पार्ट्यांचे मुंबईत आयोजन केले गेले होते. मात्र, ते कोरोनो विषाणूमुळे आयोजकांनी रद्द केल्या आहेत.

कोरोनो रोगाची दक्षता घेत मुंबईतील होळीनिमित्त होणाऱ्या पार्ट्या रद्द

हेही वाचा - महिला दिन विशेष : संसाराचा गाडा हाकण्यासाठी 'तिने' हातात घेतले रिक्षाचे 'स्टेअरिंग'

मुंबईत देखील होळी जोरात असते. एकत्र जमायचं, रंग लावायचे, धमाल करायची हे होळीचं समीकरण. पण या सणालाही आता इव्हेंटचं स्वरूप आहे. अनेक रिसॉर्ट्समध्ये या निमित्ताने कलाकारांचे परफॉर्मन्सेस, गेम्स, खाण्याची रेलचेल लोकांची झुंबड असते. अशाच पार्टीचे मुंबईत अनेक ठिकाणी दरवर्षी आयोजन करतात. मात्र, कोरानो रोगाने चीनमध्ये सुळसुळाट आहे. हा रोग सर्वत्र पसरत आहे. त्यामुळे गर्दीत हा रोग पसरतो याची दक्षता घेत मुंबईतील पार्ट्या रद्द केल्या आहेत, असे आयोजकांनी सांगितले.

मुंबईत होळी निमित्ताने एनएसयुआय मैदानात व्यापारी असोसिएशन मोठ्या पार्टीचे आयोजन करते. या पार्टीला हजारो लोक उपस्थित राहून होळी नाचत रंग उडवत साजरी करतात. मात्र, मुंबईत कोरोनो रोगाची लागण होण्याची शक्यता असल्यामुळे गर्दीत हा रोग मोठ्या प्रमाणात असतो. त्यामुळे याची दक्षता घेत व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष हिरेन शहा यांनी व त्यांच्या आयोजकांनी या पार्ट्या रद्द केल्या आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.