मुंबई - कोरोनाचा प्रसार थांबविण्यासाठी थोंडाला मास्क लावणे गरजेचे आहे. जर मास्क उपलब्ध होत नसतील तर घरातील स्वच्छ कापडाचा मास्क म्हणून वापर करू शकता. पण, पावसाळ्यात छत्री पावरल्याप्रमाणे त्या मास्कचा वापर करू नका. म्हणजेच पावसाळ्यात घराबाहेर निघताना घरात एकच छत्री असते आणि घरातील कोणीही बाहेर जाताना एकच मास्क सर्वांनी वापरू नये, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला यावेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, राज्यात फिव्हर क्लिनिक सुरू करण्यात आले आहेत. तिथेच आपली तब्येत दाखवा. कोरोना उपचारासाठी आम्ही रुग्णालयांची विभागणी केली आहे. ज्यांना सौम्य लक्षणे असतील, मध्यम स्वरुपाची, तसेच कोरोना शिवाय इतर ही रोग असतील अशी तीन रुग्णालयांची विभागणी केली असल्याचे त्यांनी सांगितले.
आपल्या अनुभवाची महाराष्ट्राला गरज
वैद्यकीय क्षेत्रातील अनुभवी लोकांना आवाहन करत मुख्यमंत्री म्हणाले, निष्णात डॉक्टर, निवृत्त सैनिक, ज्यांना आरोग्य सेवेचा अनुभव आहे. अनेक वॉर्ड बॉय, निवृत्त परिचारिका, वैद्यकीय सहायता प्रशिक्षण पूर्ण केलेल्या व्यक्ती ज्यांना सध्या काम मिळालेले नसेल मुख्यमंत्र्यांनी आवाहन केले की, कोरोना विरोधातील युद्धात सहभागी होण्याची हिंमत आणि तयारी असेल तर केवळ त्यांनीच covidyoddha@gmail.com या इमेलवर आपली माहिती द्यावी.
हेही वाचा -'राज्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा शून्यावर आणायचा आहे'