मुंबई - भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध भारत स्वतंत्र झाल्यापासून आज सुधारू शकले नाहीत. मात्र, आता या सगळ्याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अर्थात RSS ची विचारसरणी आडवी आल्याचा खळबळजनक दावा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी शुक्रवारी केला होता. त्यांच्या विधानावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी टीका केलेली आहे. आर एस एस जे जम्मू काश्मिर बद्दल मत आहे ते मत सर्व देशवासीयांचा आहे. तालिबानच्या निर्माता हा पाकिस्तानच आहे असी टोलाही राऊतांनी लगावला आहे.
आरएसएसची विचारसरणी मध्ये आली
भारताला आम्ही सांगू शकतो की गेल्या कित्येक दिवसांपासून आम्ही वाट पाहतोय सभ्य शेजारी बनून राहण्याची. पण काय करणार, आरएसएसची विचारसरणी मध्ये आली”, असं वक्तव्य इम्रान खान यांनी केले आहे. दक्षिण-मध्य आशिया परिषदेसाठी इम्रान खान सध्या उझबेकिस्तानमधील ताश्कंद येथे दाखल झाले आहेत. यावेळी पत्रकारांशी बोलताना इम्रान खान यांनी दोन्ही देशांमधील तणावपूर्ण संबंधांचं खापर आरएसएसवर फोडलं आहे.
हेही वाचा - दानिश सिद्दीकींचे पार्थिव तालिबानने आंतरराष्ट्रीय रेडक्रासला सोपवले; कुटुंबावर शोककळा