ETV Bharat / state

CM Eknath Shinde : तुम्ही कितीही ऑडिट केले तरी आमचे खुले पुस्तक - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे - Yuva Sena chief Aditya Thackeray

नगर विकास दिनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाषणातून चौफेर फटकेबाजी केली. मुंबईतील विविध कामांचे ऑडिट करण्याची मागणी काही जण करत आहेत. तुम्ही कितीही ऑडिट केले तरी आमचे खुले पुस्तक आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

CM Eknath Shinde
CM Eknath Shinde
author img

By

Published : Apr 20, 2023, 5:50 PM IST

मुंबई : पंतप्रधानांच्या मुंबई दौऱ्यावरून अनेकांना पोटदुखी सुरू आहे. काहीजण मुंबईतील विविध कामांचे ऑडिट करावे, अशी मागणी करत आहे. तुम्ही कितीही ऑडिट करा, आपली खुली किताब आहे. लोकांना दिलेल्या सोयी सुविधा यात दिसतील, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाण सोडले. नगर विकास दिनाच्या निमित्ताने राज्यभरातील नगरपालिका नगरपरिषदा जिल्हा परिषदेच्या कामकाजाचे मूल्यांकन करून पुरस्कार देण्यात आले. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणातून चौफेर फटकेबाजी केली. मुख्यमंत्र्यांचे बाण यावेळी कोणाकडे होते, यावरून चर्चेचे फड रंगले आहेत. राज्याच्या दृष्टीने आजचा नगरविकास दिन अतिशय महत्वाचा दिवस आहे. प्रत्येकाचे स्वप्न असते, की शहर चांगली दिसायला हवीत. शहराच्या पुनर्विकासासाठी प्रयत्न करायला हवेत. राज्य सरकारचा नागरिकांच्या सोयीचा महाराष्ट्र कसा होईल, याकडे कल आहे. अधिकारी वर्गाने लोकसहभागातून कामे केल्यास बदल घडेल. प्रत्यकाने शहराच्या जिव्हाळ्यासाठी काम करावे. आज ग्रामीण भागातील शहराचे नागरीकरण होत आहे. त्यासाठी तयारी असायला हवे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना केले.

राज्याला डबल इंजिनचा फायदा : राज्य सरकार कोणत्याही निर्णय घेते मात्र, त्यांची अंमलबजावणी प्रशासकीय स्तरावर होत असते. प्रशासनाने घेतलेले निर्णयाची पूर्तता करण्यासाठी मोठ्या प्रमाणात लोक चळवळ उभी राहायला हवी. तसेच कोणतेही घेतलेले निर्णय कागदावर ठेवता पूर्ण व्हायला करावेत. राज्य सरकारने यासाठी भरगच्च निधीचे बक्षीस रक्कम दिली आहे. हा निधी शहराच्या विकासासाठी वापर करायला हवा, अशी तंबी मुख्यमंत्री शिंदे यांनी अधिकाऱ्यांना दिली. आज शहरांनी आज एकमेकांसोबत स्पर्धा सुरू केली आहे. तेथे सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही यावेळी निशाणा साधला. राज्यात डबल इंजिन सरकार आल्यामुळे त्याचा फायदा होत असल्याचेही ते म्हणाले.

मुंबई खड्डेमुक्त होणार : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईत येऊन विकास कामांचे अनावरण केले. पंतप्रधान दोन वेळा मुंबईत आले, पण काही लोकांना पोटदुखी होते. त्यांच्यावर उपाय करण्यासाठी बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू केल्याचा चिमटा अप्रत्यक्षपणे ठाकरेंना काढला. तसेच रस्त्यांवरील खड्डे कमी करण्यासाठी 450 किलोमीटर रस्ते कामे हातात घेतली आहेत. पावसाळ्यात दरवर्षी खड्डे पडतात. मात्र, येत्या अडीच वर्षात मुंबई खड्डेमुक्त होणारच, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

सुंदर शहरासाठी संकल्पना मांडा : मुंबई आंतरराष्ट्रीय शहर आहे. जगभरातून पर्यटक येत असतात. तू मुंबई स्वच्छ करण्यासाठी 5 हजार स्वच्छता दूत नेमले आहेत. तसेच आपला दवाखाना सुरू केला आहे. कोळीवाडे, समुद्रकिनारे, आरोग्य, पाणी आदी विविध विकास कामांसाठी घेतले आहेत. या विविध कामांचे आता ऑडिट करावे, अशी मागणी सुरू आहे. परंतु, आपली खुली किताब आहे. कितीही ऑडिट केले, तरी लोकांना दिलेल्या सोयी सुविधा दिसतील, असा खोचक टोला युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यावर लगावला. तसेच, गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेली कामे पूर्ण करू. दरम्यान, अधिकारी वर्गाच्या अडचणी सोडवण्याची जबाबदारी शासन म्हणून आमची आहे. निधी कुठेही कमी पडणार नाही. शहर सुंदर कसे करू शकतो, यासाठी संकल्पना मांडा, असे आवाहन अधिकारी वर्गाला केले. यंदाचा अर्थसंकल्प सर्व सामावेशक असून जलदगतीने शहराचा विकास कसा होईल, यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत.

हेही वाचा - NCP Meeting Mumbai : मुंबईत राष्ट्रवादीचा मेळावा; निमंत्रण पत्रिकेत अजित पवारांचे नावच नाही, पुन्हा चर्चा सुरू

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.