ETV Bharat / state

Central Vs State Government : इंधनदरावरून केंद्र आणि राज्य सरकारमध्ये भडका - मोदी सरकार

पेट्रोल आणि डिझेलच्या दरावरून (fuel prices) केंद्र आणि राज्य सरकारमध्ये शब्दीक भडका (Disputes between Central and State Governments) उडाला आहे. आज पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी केल्याची घोषणा केंद्र सरकारने केली. केवळ दिखावा करू नका, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) मोदी सरकारला (Modi government) सुनावले. इंधनाचे दर अजून कमी करायला हवेत, अशी मागणीही केली.

Uddhav Thackeray - Narendra Modi
उध्दव ठाकरे - नरेंद्र मोदी
author img

By

Published : May 21, 2022, 10:19 PM IST

मुंबई: केंद्र सरकारने दोन महिन्यांपूर्वी पेट्रोलवरचा अबकारी कर प्रति लिटर १८.४२ रुपये इतका वाढविला होता. आज ८ रुपयांनी हे दर कमी केल्याची घोषणा केली. डिझेलवरील अबकारी कर देखील १८ रुपये २४ पैशांनी वाढविले आहेत. आता ६ रुपयांनी कमी केल्याची घोषणा केली आहे. आधी किंमती भरमसाठ वाढवायच्या आणि नंतर नाममात्र कमी करून दर कमी केल्याचा आव आणायचा हे बरोबर नाही, अशी टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. तसेच आकडेवारीच्या जंजाळात नागरिकांना अडकवून न ठेवता सहा सात वर्षांपूर्वी असलेला अबकारी कराइतकी कपात केल्यासच खऱ्या अर्थाने देशातील नागरिकांना दिलासा मिळेल, असे मुख्यमंत्री म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.