मुंबई - बॉलिवूडमधील ज्येष्ठ आणि अग्रगण्य दिग्दर्शक बासू चटर्जी यांचे मुंबईत वयाच्या 93व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांनी छोटीसी बात, रजनीगंधा, बातों बातों में, एक रुका हुआ फैसला आणि चमेली की शादी यासारख्या चित्रपटांची निर्मिती केली. समीक्षक आणि चित्रपटनिर्माते अशोक पंडित यांनी चॅटर्जींच्या निधनाबद्दल ट्विट करून माहिती दिली. त्यांच्या जाण्याने एक सिद्धहस्त दिग्दर्शक हरपल्याची भावना बॉलिवूडमधून व्यक्त होत आहे.
-
I am extremely grieved to inform you all of the demise of Legendary Filmmaker #BasuChatterjee ji. His last rites will be performed today at Santacruz crematorium at 2 pm.
— Ashoke Pandit (@ashokepandit) June 4, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
It’s a great loss to the industry. Will miss you Sir. #RIPBasuChaterjee pic.twitter.com/5s0wKkpeDB
">I am extremely grieved to inform you all of the demise of Legendary Filmmaker #BasuChatterjee ji. His last rites will be performed today at Santacruz crematorium at 2 pm.
— Ashoke Pandit (@ashokepandit) June 4, 2020
It’s a great loss to the industry. Will miss you Sir. #RIPBasuChaterjee pic.twitter.com/5s0wKkpeDBI am extremely grieved to inform you all of the demise of Legendary Filmmaker #BasuChatterjee ji. His last rites will be performed today at Santacruz crematorium at 2 pm.
— Ashoke Pandit (@ashokepandit) June 4, 2020
It’s a great loss to the industry. Will miss you Sir. #RIPBasuChaterjee pic.twitter.com/5s0wKkpeDB
आपल्या दिग्दर्शिय कारकिर्दीत छोटी सी बात, रजनीगन्धा, बातों बातों में, एक रुका हुआ फैसला,चक्रव्यूह, मंझिल, स्वामी, प्रियतमा, शौकिन, चमेली की शादी, प्रेम विवाह, चितचोर असे एकाहून एक सरस आणि यादगार सिनेमे त्यांनी दिले. या सिनेमांचे गारूड आजही सिनेरसिकांच्या मनावर आहे. मंजिलमध्ये अमिताभ बच्चन, चक्रव्यूहमध्ये राजेश खन्ना, मनपसंदमध्ये देव आनंद आणि शौकीनमध्ये मिथुन चक्रवर्ती यासारख्या सुपरस्टार्सबरोबर त्यांनी काम केले.
दिवंगत अभिनेता देव आनंद यांचे आवडते दिग्दर्शक म्हणून देखील ते ओळखले जायचे, मात्र त्याहूनही जास्त सर्वसामान्य व्यक्तींचे आयुष्य पडद्यावर मांडण्यात त्यांची मोठी हातोटी होती. त्यामुळेच त्यांचे सिनेमे आज देखील सर्वसामान्य माणसाला आपलेसे वाटतात. आता त्यांच्या या कलाकृती आपल्याला आयुष्यभर त्यांची आठवण जिवंत ठेवण्यासाठी उपयुक्त ठरणार आहेत.