ETV Bharat / state

धारावीसह माहिम स्थानकावर जनता कर्फ्यूला नागरिकांचा प्रतिसाद; गल्लोगल्ली शांतता - Mahim Railway

आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीत नीरव शांतता दिसून येत आहे. येथील छोटे-मोठे उद्योग धंदे बंद आहेत. कोरोनाचा प्रभाव कमी करण्यासाठी जनता कर्फ्यूचे पालन करण्यात येत आहे.

corona-virus-outbreak
कोरोना अपडेट
author img

By

Published : Mar 22, 2020, 8:06 AM IST

मुंबई - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत चालला आहे. या पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'जनता कर्फ्यू'चे पालन करण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे. या आवाहनला प्रतिसाद देत देशभरासह मुंबईत देखील जनता कर्फ्यू पाळण्यात आला आहे. 1992 आणि 93 दंगलीनंतर पहिल्यांदाच 'जनता कर्फ्यू'चा प्रभाव धारावीत दिसत आहे.

धारावीत आणि माहीम स्थानकावर जनता कर्फ्यूला नागरिकांचा प्रतिसाद

हेही वाचा - पंतप्रधानांच्या आवाहनानंतर आज देशभर 'जनता कर्फ्यू'..

आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीत नीरव शांतता दिसून येत आहे. येथील छोटे-मोठे उद्योग धंदे बंद आहेत. एरवी पहाटेपासूनच गजबज असलेल्या धारावीत लोकांनी घरीच थांबणे पसंद केले आहे. कोरोनाचा प्रभाव कमी करण्यासाठी जनता कर्फ्यूचे पालन करण्यात येत आहे.

रेल्वे सेवा ही अंशत: सुरू आहे. नेहमी माहिम स्थानकातील पुलावर आणि स्थानकात पहाटे पासून मोठी गर्दी असते. मात्र, आज जनता कर्फ्यू असल्यामुळे या ठिकाणी निरव शांतता दिसत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.