ETV Bharat / state

मसाला किंग धनंजय दातार यांची माणुसकी, आखाती देशातून भारतात परतणाऱ्यांना मदत

author img

By

Published : Jun 1, 2020, 8:41 PM IST

डॉ. धनंजय दातार यांनी युएईमधील भारतीयांच्या मायदेशी परतण्यासाठीच्या तिकीट खर्चात आणि कोविड चाचणी शुल्कामध्ये हातभार लावण्याचे आश्वासन दिले आहे. डॉ. दातार म्हणाले, की ज्यांना आपल्या जन्मभूमीवर परतीचा प्रवास करण्यासाठीचा खर्च परवडत नाही अशांना मदत करणाऱ्यासाठी मी वैयक्तिकरित्या पुढाकार घेत आहे.

Dhananjay Datar provide financial help
आखाती देशातून भारतात परतणाऱ्यांना मदत

मुंबई - कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर युएईमध्ये अनेक भारतीय अडकले आहेत. याच भारतीयांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. या देशांमधील हवाई वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली असून भारतीय वाणिज्य दूतावासकडे नावे नोंदविण्याची प्रक्रिया तसेच तिकिट बुकिंगही सुरू झाले आहे. आता अल आदिल ट्रेडिंगचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. धनंजय दातार हे भारतात परतणाऱ्या या गरजू प्रवाशांच्या हवाई तिकिट खर्चासाठी आर्थिक मदत करणार आहेत.

डॉ. धनंजय दातार यांनी युएईमधील भारतीयांच्या मायदेशी परतण्यासाठीच्या तिकीट खर्चात आणि कोविड चाचणी शुल्कामध्ये हातभार लावण्याचे आश्वासन दिले आहे. डॉ. दातार म्हणाले, की ज्यांना आपल्या जन्मभूमीवर परतीचा प्रवास करण्यासाठीचा खर्च परवडत नाही अशांना मदत करणाऱ्यासाठी मी वैयक्तिकरित्या पुढाकार घेत आहे. जागतिक साथीच्या वेळी अडचणीत सापडलेल्यांना मदत करण्यासाठी भारत सरकारने केलेले प्रयत्न हे सर्वात मोठे पाऊल आहे. याला आपण सर्वात मोठे आपात्कालीन स्थलांतर म्हणू शकतो. या क्षणी आपल्या सर्व बंधू-भगिनींना संकटात मदत करणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. त्यामुळेच त्यांना पुन्हा मायदेशी आणण्यासाठी शक्य ती सर्व मदत करणार असल्याचे दातार यांनी जाहीर केले आहे.

पुढे दातार म्हणाले, बरेच लोक असे आहेत जे विमान भाडे आणि कोविड चाचणीची फी भरण्यास असमर्थ ठरत आहेत. मला समजले आहे, की नोकरी गमावलेल्या बऱ्याच व्यक्तींकडे पैसे नसल्यामुळे हे साधे खर्चदेखील ते करू शकत नाहीत. आशा गरजूंना मदतीचा हात देण्यासाठी मी काही संस्थांशी समन्वय साधत आहे. यासंदर्भात सर्व आवश्यक मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे अनुसरण करून त्यांना शक्य ती मदत केली जाईल, असे ते म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.