ETV Bharat / state

बदलापूर घटनेतील आरोपीच्या एन्काऊंटरवर उदयनराजे म्हणाले; "गोळ्या घालून मारण्यापेक्षा...." - Akshay Shinde Encounter - AKSHAY SHINDE ENCOUNTER

Akshay Shinde Encounter : बदलापूर घटनेतील आरोपीच्या एन्काऊंटरवर प्रतिक्रिया देताना खासदार उदयनराजेंनी (Udayanraje Bhosale) सर्वच राजकारण्यांना खडे बोल सुनावले आहेत. तसंच अशा घटनांमधील शिक्षेसाठी कायद्यात बदल करा, असंही त्यांनी सूचित केलं.

Akshay Shinde Encounter
खासदार उदयनराजे भोसले (File Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 24, 2024, 8:20 PM IST

सातारा Akshay Shinde Encounter : बदलापूर घटनेतील संशयित आरोपी अक्षय शिंदेला गोळ्या घालून मारणं ही फार सहज शिक्षा आहे. त्यापेक्षा अशा लोकांना जनतेत सोडायला पाहिजे. जनतेने त्यांना तुडवून मारलं पाहिजे, अशी संतप्त प्रतिक्रिया खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी माध्यमांशी बोलताना दिली. बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीचा सोमवारी (23 सप्टेंबर) पोलीस एन्काऊंटरमध्ये मृत्यू झाला होता. या घटनेत दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले होते.

कायद्यात बदल करा : खासदार उदयनराजे म्हणाले की, "प्रत्येक गोष्टीकडं जर राजकारण म्हणून बघितलं जात असेल तर याच्याएवढं दुर्दैव नाही. बदलापूरमधील घटनेसारख्या भरपूर घटना आधीही घडल्या आहेत. यापुढेही घडत राहणार. कारण, अशा प्रवृत्तींवर धाकच राहिलेला नाही. अशा घटना कोणासोबतही घडू नयेत, पण घडतात. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळाप्रमाणे नराधमांना कठोर शिक्षा झाली पाहिजे. त्यासाठी कायद्यात बदल करा."

प्रतिक्रिया देताना खासदार उदयनराजे भोसले (ETV Bharat Reporter)

आरोपींना लोकांच्या ताब्यात द्या : "लैंगिक शोषणासारख्या घटनांमधील आरोपींना सरळ लोकांच्या ताब्यात द्या, जाहीर फाशी देऊन टाका," असा संताप व्यक्त करून उदयनराजे म्हणाले की, "आज समाज स्वतःला असुरक्षित समजत आहे. निष्पाप लोकांना मारणाऱ्या अजमल कसाबवर करोडो रूपये खर्च झाले. तेच दुसऱ्या देशात असं घडलं असतं तर लोकांनी गोळ्या घालून मारलं असतं".

राजकीय नेत्यांना सुनावले खडे बोल : "मला सत्ताधारी अथवा विरोधकांशी देणं घेणं नाही. अशी घटना यांच्या संदर्भात घडली असती तर काय केलं असतं?" असा सवाल उदयनराजेंनी केला. "पीडित कुटुंबाला वाईट परिस्थितीला सामोरं जावं लागतं. म्हणून मी स्वतःला त्यांच्या ठिकाणी समजून बोलत असतो," असं त्यांनी सांगितलं.

हेही वाचा -

  1. "अक्षय शिंदे एन्काऊंटर संपूर्णपणे फेक तसेच स्क्रिप्टेट; कोर्टात जाणार" - Akshay Shinde Encounter
  2. अक्षय शिंदेचा 'एन्काऊंटर' करणाऱ्या पोलिसांना शर्मिला ठाकरेंकडून बक्षीस; किती पैसे मिळणार? - Akshay Shinde Encounter
  3. बदलापूर अत्याचार प्रकरणातील नराधमाचा 'एन्काऊंटर'; गृह विभाग संशयाच्या भोवऱ्यात, सीसीटीव्ही गायब - Akshay Shinde Encounter

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.