मुंबई : विधानसभा सदस्य मुक्ता टिळक यांच्या अंत्यसंस्कारासाठी देवेंद्र फडवणीस (Fadnavis Returned from Delhi) हे काल सकाळी विशेष विमानाने पुण्यात गेले व तेथूनच त्यांनी दिल्ली (Devendra Fadnavis Delhi Tour) गाठली. अचानक देवेंद्र फडणवीस हे दिल्लीसाठी रवाना झाल्या कारणाने अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले. विशेष म्हणजे, हिवाळी अधिवेशनामध्ये (Legislature Winter Session) एनआयटी भूखंड घोटाळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरच आरोप झाल्या कारणाने विरोधकांनी सरकारला धारेवर धरण्याचा पूर्ण प्रयत्न केला आहे. (Latest news from Mumbai)
या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी भाजप आमदारानेच केली असल्याकारणाने मुख्यमंत्री अजून अडचणीत आहेत. (suspense of Delhi tour remains)
सरकारची कोंडी करण्याचे प्रयत्न : दुसरीकडे सीमा वादावरून कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई हे दररोज नव नवीन वक्तव्य करीत आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी यासंदर्भामध्ये मागे महाराष्ट्र व कर्नाटक या दोन्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांना समज दिली असून हा प्रश्न न्यायप्रविष्ठ असल्या कारणाने दोघांनी शांतता राखावी असे सांगितले होते; परंतु त्यानंतर सुद्धा कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची वक्तव्य सुरू असल्याकारणाने विरोधी पक्षाकडून सरकारची कोंडी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अशातच दिशा सालियन प्रकरणावरून सत्तारूढ पक्षाने माजी मंत्री, शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांना घेरले आहे. देवेंद्र फडणीस यांनी या प्रकरणासाठी एसआयटी गठीत केली आहे. या सर्व विषयांसह अमरावती येथील व्यावसायिक उमेश कोल्हे प्रकरणात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या फोनची ही चौकशी करण्याचं सरकारने ठरवलं आहे. या सर्व मुद्द्यांवर गृहमंत्री अमित शहा यांच्याशी त्यांची बैठक झाली असल्याचं सांगण्यात येत आहे.
सोमवारी अधिवेशन गुंडाळले जाण्याची शक्यता?
नागपूर येथे सुरू असलेल्या राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा दुसरा आठवडा सोमवारपासून सुरू होत आहे. पहिल्या आठवड्यात सत्ताधारी व विरोधक दोघेही विविध मुद्द्यावर आक्रमक झाले असून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विधानसभा अध्यक्षांंबद्दल उच्चारलेल्या आक्षेपार्ह विधानावरून त्यांचं अधिवेशन संपेपर्यंत निलंबन सुद्धा करण्यात आलेलं आहे. अशातच विरोधक पुन्हा पुढच्या आठवड्यात आक्रमक होणार आहेत. जोपर्यंत जयंत पाटील यांचे निलंबन मागे घेतलं जात नाही तोपर्यंत सभागृहात बसणार नाही असा पवित्रा विरोधी पक्षांनी घेतला आहे. अनेक मुद्द्यांवर सत्ताधारी व विरोधक वारंवार आक्रमक होत असून अधिवेशनाचे कामकाजही व्यवस्थित होत नाही आहे. अशातच दिल्लीमध्ये सुद्धा संसदेचे अधिवेशन हे एक आठवडा अगोदरच गुंडाळले गेले आहे. त्या अनुषंगाने सुद्धा कदाचित सोमवारीच हे अधिवेशन गुंडाळले जाण्याची ही शक्यता वर्तवली जात आहे.