ETV Bharat / state

Devendra Fadnavis Kalank Remark : 'उद्धव ठाकरे यांचे मानसिक संतुलन बिघडले, त्यांना....' - देवेंद्र फडणवीस नागपूर कलंक

कलंक शब्दावरून सुरू झालेले (Kalank Remark) राजकारण आता आणखी तीव्र होताना दिसत आहे. देवेंद्र फडणवीस हे नागपुरला लागलेले कलंक आहेत, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली होती. त्यावर आता खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ठाकरे यांचे मानसिक संतुलन बिघडले असल्याचे फडणवीस म्हणाले.

Etv Bharat
Etv Bharat
author img

By

Published : Jul 11, 2023, 4:36 PM IST

Updated : Jul 11, 2023, 5:11 PM IST

प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई - शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील शाब्दिक चकमक दिवसेंदिवस (Kalank Remark) टोकाला पोहोचत आहे. सोमवारी नागपुरात बोलताना उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस हे नागपूरला लागलेले कलंक असल्याचे म्हटले होते. त्यानंतर आरोप प्रत्यारोपांचा सिलसिला दोन्ही बाजूने जोरात सुरू आहे. यावर आता देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरे यांचे मानसिक संतुलन बिघडले असून त्यांना मानसोपचार तज्ञांची आवश्यकता असल्याचे फडणवीस म्हणाले.

उद्धव ठाकरे यांचे मानसिक संतुलन बिघडले असून त्यांना मानसोपचार तज्ञांची आवश्यकता आहे - देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री

काय म्हणाले फडणवीस? - सध्या राजकीय घडामोडींना राज्यात वेग आलेला असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातील आरोप प्रत्यारोप दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता उद्धव ठाकरे यांचे मानसिक संतुलन फार मोठ्या प्रमाणामध्ये बिघडले आहे. अशा परिस्थितीमध्ये त्यांना मानसोपचार तज्ञांची गरज असल्याचे फडणवीस यांनी सांगितले आहे.

काय म्हणाले उद्धव ठाकरे? - उद्धव ठाकरे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते टिळक पुरस्कार स्वीकारणार आहेत. अशाप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः राष्ट्रवादीवर ७० हजार कोटींचा भ्रष्टाचाराचा आरोप लावला होता. मग या आरोपांचे काय झाले? असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. त्याचबरोबर राजकारणात सुसंस्कृतपणा असायला पाहिजे. तुम्ही एखाद्याला कलंकित म्हटले की तो कलंकित, तुम्ही एखाद्याला देव म्हटले, की तो देव, हे चालणार नाही. या अगोदर ज्यांना तुम्ही कलंकित म्हणून संबोधले होते, त्याच लोकांच्या मांडीला मांडी लावून आता तुम्ही बसत आहात हे कसे चालू शकते?असा प्रश्नही उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.

हेही वाचा -

  1. Devendra Ek Abhiman : उद्धव ठाकरेंच्या वक्तव्याचे नागपुरात संतप्त पडसाद, भाजप विरुद्ध शिवसेनेत रंगले ट्विटर 'वार'
  2. Uddhav Thackeray : 'मी फक्त जाणीव करून दिली, शिव्या दिल्या नाही', फडणवीसांवरील वक्तव्यावर उध्दव ठाकरेंचा खुलासा
  3. Chandrashekhar Bawankule :... तर जोडे खावे लागतील; चंद्रशेखर बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंना इशारा

Last Updated : Jul 11, 2023, 5:11 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.