ETV Bharat / state

Devendra Fadnavis : ‘सेल्फी विथ मेरी माटी’ उपक्रम; चीनचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र पुढे आला - देवेंद्र फडणवीस - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

Fadnavis On Selfie With Meri Mati : केंद्र सरकारच्यावतीनं राबविण्यात आलेल्या ‘मेरी माटी मेरा देश’ या उपक्रमाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंद करण्यात आली आहे. याप्रसंगी देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी चीनच्या नावे असलेला वर्ल्ड रेकॉर्ड मोडण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र पुढे आला असल्याची भावना व्यक्त केली. ते पुण्यात प्रमाणपत्र प्रधान सोहळात बोलत होते.

Devendra Fadnavis
देवेंद्र फडणवीस
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 9, 2023, 10:47 PM IST

माहिती देताना देवेंद्र फडणवीस

मुंबई Fadnavis On Selfie With Meri Mati : 'सेल्फी विथ मेरी माटी' (Mera Mati Mera Desh campaign) या केंद्र सरकारच्या वतीने राबविण्यात आलेल्या 'मेरी माटी मेरा देश' या अभियानाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये (Guinness Book Of Records) नोंद करण्यात आली आहे. पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठाने हा उपक्रम राबवला होता. मुंबई विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात 'गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड'चे प्रमाणपत्र देण्याचा प्रधान सोहळा पार पडला.

सर्वांच्या पुढाकारामुळे वर्ल्ड रेकॉर्ड : याप्रसंगी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, भारताला आज 'गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड' मध्ये नवीन स्थान सर्वांच्या सहकार्याने प्राप्त झाले आहे. यासाठी सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापीठाची (Savitribai Phule Pune University) टीम यांचं नामकरण आता रेकॉर्ड टीम असेच करावे लागणार आहे. हा वर्ल्ड रेकॉर्ड होण्याकरता मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री दीपक केसरकर, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी घेतलेला पुढाकार व स्वतः मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात बैठका घेऊन महाराष्ट्र सरकार या उपक्रमाच्या पाठीशी राहिले. याकरता जे काही कार्य करायला हवं होतं ते सर्व त्यांनी केलं. म्हणूनच हा वर्ल्ड रेकॉर्ड आपण करू शकलो.

जन्मापासून मरेपर्यंत आपल्या सोबत : फडणवीस पुढे म्हणाले की, जेव्हा आपण 'स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव' साजरा केला. तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी सांगितलं होतं की, प्रत्येक व्यक्ती हा देशाच्या स्वातंत्र्याशी, देशाच्या लोकशाही जोडला गेला पाहिजे. केवल एक दिवस स्वातंत्र्य दिवस, केवळ एक दिवस अमृत महोत्सव साजरा केला, असं करून चालणार नाही. तर भावनात्मक दृष्ट्या आपण आपल्या देशाशी जोडलं पाहिजे, असा विचार त्यांनी मांडला होता.

जवळपास साडे पंचवीस लाख सेल्फी आपण अपलोड केल्यानंतर त्यातील १० लाख ४२ हजार ५३८ सेल्फी या मान्य करण्यात आल्या. हा रेकॉर्ड करण्याचं काम आपण केलेलं आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे चीनच्या नावाने असलेला रेकॉर्ड मोडण्याचे काम करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र पुढे आला हे सर्वात महत्त्वाचं आहे. - देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

मातीचे आभार मानावे : अटलजी नेहमी म्हणायचे की, भारत यह केवल एक जमीन का टूकडा नही है, तो जीता जागता राष्ट्रपुरुष है. तर आपणही भारताला केवळ जमिनीचा तुकडा मानला नाही, भूभाग मानला नाही, तर आपण नेहमी भारत माता म्हटलं आहे. खरोखर माता आणि माती या दोन गोष्टी अशा आहेत त्या आपल्या जन्मापासून आपल्याला मरेपर्यंत साथ देतात. आपणाला मोठे करतात आणि त्यांच्याच आशीर्वादाने आपल्याला जीवनामध्ये जे काही भेटायचं आहे ते भेटत असतं. म्हणून मातेचं उत्तराई होता येत नाही तसेच मातीचेही उत्तराई होता येत नाही. म्हणून तीच माती हातात घेऊन कपाळाला लावून कधीतरी त्या मातीला सांगावं लागतं की, आम्ही तुझे आभारी आहोत. त्या मातीचे आभार मानावे लागतात. त्या मातीला नमन करावं लागतं. त्या मातीला वंदन करावं लागतं.

१० लाख ४२ हजार ५३८ सेल्फी मान्य : देशातील सर्व स्तरातून गावागावापर्यंत मातीला वंदन करून एकत्रित करण्याचे काम समाजातील प्रत्येक घटकांनी केलं आहे. जेव्हा ही कल्पना मांडली तेव्हा असं सांगण्यात आलं की, आपलं जे देशासाठी समर्पण आहे त्याचा सुद्धा एक वर्ल्ड रेकॉर्ड केला जाऊ शकतो. सरकार तर सोबत होतंच परंतु समाज संपूर्ण त्यांच्यासोबत जोडण्याचं काम हे चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आणि हा वर्ल्ड रेकॉर्ड आपण करू शकलो.

हेही वाचा -

  1. Maratha Reservation : राज्यातील सामाजिक सलोखा बिघडू नये ही सर्वांचीच जबाबदारी - देवेंद्र फडणवीस
  2. Maratha Reservation : 'फडणवीसांना मुख्यमंत्री होऊ न देण्याच्या नादात उद्धव ठाकरेंनी मराठा समाजाचा घात केला'
  3. Maratha Reservation Protest : मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांच्यात मध्यरात्री खलबत; सर्वपक्षीय बैठकीचं ठाकरे गटाला निमंत्रण नाही?

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.