ETV Bharat / state

Devendra Fadnavis on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या तोंडी फक्त शिवराळ भाषा; देवेंद्र फडणवीसांची टीका

जळगावातील पाचोरा येथे काल (रविवारी) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा पार पडली. त्यात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच थेट आव्हान केले आहे. त्यांच्या या मुद्द्यावर बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांच्या तोंडी फक्त शिवराळ भाषा असल्याचे फडणवीस म्हणाले.

Fadnavis criticizes Thackeray language
फडणवीस
author img

By

Published : Apr 24, 2023, 9:13 PM IST

ठाकरेंनी केलेल्या मोदींवरील टीकेवर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया

मुंबई: उद्धव ठाकरे यांच्या प्रश्नांना आज उपमुख्यमंत्री, भाजप नेते, देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले आहे. यावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, त्यांच्या भाषणामध्ये फक्त निराशा होती आणि तेच तेच मुद्दे होते. काही नेते फक्त शिवराळ भाषा वापरतात. राज्याचा विकास, शेतकऱ्यांच्या जीवनातील परिवर्तन, रोजगार निर्मिती यावर ते एक शब्दसुद्धा बोलत नाहीत. त्यांच्या संपूर्ण जीवनामध्ये महाराष्ट्राच्या विकासाचा एक प्रोजेक्ट ते दाखवू शकत नाहीत की ज्याच्यावरती ते बोलू शकतील? असा प्रश्नही देवेंद्र फडणवीसांनी उपस्थित केला. यामुळेच ठाकरेंची निराशा यातून बाहेर येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. ते जेवढे त्यांना शिव्या देतील तेवढे ते मोठे व प्रसिद्ध होतील, असेही फडणवीस म्हणाले.

काय म्हणाले होते उद्धव ठाकरे? जळगावात, पाचोरा येथे काल (रविवारी) सभेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी भाजप व एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधत त्यांना थेट आव्हान केले होते. येणाऱ्या निवडणुका या एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात भाजप लढणार आहे, हे त्यांनी जाहीर करावे असेही उद्धव ठाकरे म्हणाले होते. तुम्ही आमच्याकडून चोरलेले धनुष्यबाण घेऊन या, तर भाजपने मोदींचा चेहरा घेऊन यावे; परंतु मी माझे नाव घेऊन येईन. नंतर बघू महाराष्ट्र कोणाला निवडून देतो? असे आव्हान ठाकरेंनी केले. सध्या सर्वत्र आग दिसत असल्याने निवडणुका पुढे ढकलल्या जात आहेत. तुमची हिम्मत असेल तर निवडणुका लावा, आमची तयारी आहे. आम्ही मशाल घेऊन येतो तर तुम्ही धनुष्यबाण घेऊन या असे सांगत मर्द असाल तर या महाविकास आघाडीच्या वज्रमूठीचा सामना करून दाखवा, असे थेट आव्हान उद्धव ठाकरेंनी शिंदे-फडवणीस सरकारला केले.

'ती' टीका वैयक्तिक द्वेषातून: शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पाचोर्‍यातील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर घणाघाती टीका केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या टीकेला प्रत्युत्तर देताना म्हणाले की, लोकप्रियतेची पोटदुखी झाल्याने उद्धव ठाकरे यांनी वैयक्तिक द्वेषातून टीका केली. त्यांचे वक्तव्य दुर्दैवी आणि निंदनीय असून ही बाळासाहेब ठाकरे यांची संस्कृती होऊ शकत नाही, असा टोलाही शिंदेंनी लगावला.

ते निघून जातील पण: जळगाव येथे उद्धव ठाकरे हे मोदींचा एकेरी उल्लेख करत म्हणाले, ''मै फकीर आदमी हूँ, झोला उठा के चला जाऊंगा'', असे सांगतात. ते निघून जातील पण, जनतेच्या हातात कटोरा देतील असा हल्लाबोल ठाकरेंनी केला. ठाकरे यांच्या सभेची आज राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. भाजप आणि शिंदे गटाकडून यावर पलटवार केला जात आहे. मुख्यमंत्री शिंदेनी देखील ठाकरेंच्या सभेवर तोंडसुख घेतले.

हेही वाचा: Heatstroke Death Case : उष्माघात मृत्यूप्रकरणी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; मुंबई उच्च न्यायालयात याचिका

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.