ETV Bharat / state

Devendra Fadnavis: ऋतुजा लटके राजीनामा प्रकरणात कोणावरही दबाव नसल्याचा फडणवीसांचा खुलासा - Rituja Latke Resignation Case

Devendra Fadnavis: अंधेरी पूर्व पोट निवडणुकीतील ठाकरेंच्या कोंडीसाठी उमेदवार ऋतुजा लटके (Rituja Latke Resignation Case) यांच्या कर्मचारी पदाचा राजीनामा स्वीकारण्यास मनपाकडून जाणीवपूर्वक विलंब केला जात असल्याचा आरोप केला जात होता. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर खुलासा (Fadnavis clarification on Rituja Latke resignation ) करताना, कोणावरही दबाव​ ​नसल्याचे स्पष्ट केले.(update on Andheri East General Election)

Rituja Latke Resignation Case
Rituja Latke Resignation Case
author img

By

Published : Oct 12, 2022, 8:40 PM IST

मुंबई : Devendra Fadnavis: अंधेरी पूर्व पोट निवडणुकीतील ठाकरेंच्या कोंडीसाठी उमेदवार ऋतुजा लटके (Rituja Latke Resignation Case) यांच्या कर्मचारी पदाचा राजीनामा स्वीकारण्यास मनपाकडून जाणीवपूर्वक विलंब केला जात असल्याचा आरोप केला जात होता. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर खुलासा (Fadnavis clarification on Rituja Latke resignation ) करताना, कोणावरही दबाव​ ​नसल्याचे स्पष्ट केले. नियम सर्वांना सारखे असल्याचे ते म्हणाले. (update on Andheri East General Election)

ऋतुजा लटके यांचा महिन्याभरापूर्वीच राजीनामा, तरी मंजूरी नाही- अंधेरी पूर्व पोट निवडणुकीतील शिवसेनेच्या अडचणी वाढत आहेत. शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांनी महानगरपालिका कर्मचारी पदाचा महिन्याभरापूर्वी राजीनामा दिला. मनपा प्रशासनाकडून अद्याप मंजूर केलेला नाही. शिवसेना याविरोधात आक्रमक झाली आहे. तसेच शिंदे गट आणि भाजपकडून दबाव टाकला जात आहे. माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर आरोप केले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

कोणताही दबाव आणला जात नाही; फडणवीसांचे स्पष्टीकरण - फडणवीस म्हणाले की, नियम सर्वांसाठी सारखेच आहे. कोणताही दबाव आणला जात नाही. आमचा कोणावरही दबाव नाही. बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजप एकत्र लढणार आहोत. कोण उमेदवार द्यायचा याचा निर्णय चर्चेतून घेतला जाणार असल्याचे फडणवीस यांनी म्हटले. महापालिका पूर्णपणे स्वयत्ता आहे. राजीनामा घेण्याबाबत त्यांचे निर्णय आहे. सरकार काहीही हस्तक्षेप करत नाही. आमचा त्यात हस्तक्षेप नसल्याचे फडणवीस म्हणाले. तसेच भाजपचा अद्याप उमेदवार ठरलेला नाही. चर्चा करुन उमेदवाराबाबत निश्चित करु, असे फडणवीस म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.