ETV Bharat / state

विविध मागण्यांसाठी बेस्ट कामगार आक्रमक, डेपोबाहेर निदर्शने

बेस्ट कर्मचाऱ्यांसाठी बेस्टच्या जागेवर कोरोना रुग्णालय बांधण्यात यावे. बेस्ट कामगारांना सुरक्षितता द्यावी. त्यांना वैद्यकीय सुविधा पुरवावी. कोरोना काळात कर्मचाऱ्यांवर करण्यात आलेली अन्यायकारक चौकशी मागे घ्यावी. यासारख्या मागण्यांसाठी आजपासून बेस्ट प्रशासनाविरोधातील मूक निदर्शने केली जात आहेत.

various demands of BEST workers
विविध मागण्यांसाठी बेस्ट कामगार आक्रमक
author img

By

Published : Jun 11, 2020, 5:51 PM IST

मुंबई - कर्मचाऱ्यांच्या न्याय मागण्यांसाठी आज घाटकोपर व वडाळा बस डेपोबाहेर बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीने मूक निदर्शने केली. कोरोनामुळे अत्यावश्यक सेवेच्या कर्मचाऱ्यांना सेवा देताना, वीज पुरवठा करताना मोठया संख्येने बेस्टचे कर्मचारी बाधीत झाले. तर आतापर्यंत 54 कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. मात्र, हा आकडा लपवला गेल्याचा आरोप निदर्शनावेळी केला गेला.

54 बेस्ट कामगारांचा मृत्यू झालेला असताना प्रशासनाकडून ही आकडेवारी 9 दाखवण्यात आली आहे. सोबतच बेस्ट कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील किती सदस्य कोरोनाबाधित झालेत याची माहिती बेस्ट प्रशासनाकडे उपलब्ध नाही. मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना नोकरी तसेच विमा कवच द्यावे लागेल, यामुळे बेस्ट जाणीवपूर्वक ही माहिती लपवत असल्याचा आरोप संयुक्त कामगार कृती समितीने केला आहे.

या आहेत मागण्या -

बेस्ट कर्मचाऱ्यांसाठी बेस्टच्या जागेवर कोरोना रुग्णालय बांधण्यात यावे. बेस्ट कामगारांना सुरक्षितता द्यावी. त्यांना वैद्यकीय सुविधा पुरवावी. कोरोना काळात कर्मचाऱ्यांवर करण्यात आलेली अन्यायकारक चौकशी मागे घ्यावी. यासारख्या मागण्यांसाठी आजपासून बेस्ट प्रशासनाविरोधातील मूक निदर्शने केली जात आहेत. मागण्या मान्य होईपर्यंत सर्व बस आगारात रोज निदर्शने होतील, असे बेस्ट कामगार संयुक्त कृती समितीचे अध्यक्ष शशांक राव यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.