ETV Bharat / state

कॅप्टन दीपक साठे यांचे पार्थिव मुंबईत दाखल - कॅप्टन दीपक साठे न्यूज

केरळच्या कोझिकोड विमानतळावर झालेल्या विमान अपघातात वैमानिक दीपक साठे यांचा मृत्यू झाला होता. त्यांचे पार्थिव विशेष विमानाने मुंबईत आणण्यात आले. त्यांची पत्नी आणि मुले या ठिकाणी उपस्थित असून त्यांचे सहकारी आणि एअर इंडियाचे कर्मचारी साठे यांच्या पार्थिवाचे दर्शन घेत आहेत. मंगळवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार होतील, अशी माहिती मिळत आहे.

deepak sathe
दीपक साठे
author img

By

Published : Aug 9, 2020, 4:27 PM IST

Updated : Aug 9, 2020, 5:24 PM IST

मुंबई - कॅप्टन दीपक साठे यांचे पार्थिव विशेष विमानाने मुंबईत पोहचले. त्यांचे पार्थिव एअर इंडियाच्या कार्गो येथील इमारतीमध्ये ठेवण्यात आले आहे. त्यांची पत्नी आणि मुले या ठिकाणी उपस्थित असून त्यांचे सहकारी आणि एअर इंडियाचे कर्मचारी साठे यांच्या पार्थिवाचे दर्शन घेत आहेत. मंगळवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार होतील, अशी माहिती मिळत आहे. केरळच्या कोझिकोड विमानतळावर झालेल्या विमान अपघातात वैमानिक दीपक साठे यांचा मृत्यू झाला होता.

कॅप्टन दीपक साठे यांचे पार्थिव मुंबईत दाखल

हवाईदलात अधिकारी राहिलेले कॅप्टन दीपक साठे हे कुशल लढाऊ वैमानिक होते. १५ वर्षांपासून ते एअर इंडियामध्ये वैमानिक होते. साठे हे 1981 साली हवाईदलात वैमानिक म्हणून रूजू झाले. त्याअगोदर त्यांनी पुण्याच्या एनडीएमधून प्रशिक्षण घेतले होते. 2003 पर्यंत त्यांनी हवाईदलात लढाऊ वैमानिक म्हणून सेवा दिली.

शुक्रवारी 'वंदे भारत मिशन'अंतर्गत दुबईवरून केरळला येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाला अपघात झाला. कोझिकोड येथे लँडिंग करताना रनवेवरुन घसरल्याने हा अपघात झाला. यामध्ये १९ प्रवाशांचा मृत्यू झाला तर १२३ प्रवासी गंभीर जखमी झाले. यातील २४ जणांची प्रकृती गंभीर आहे.

Last Updated : Aug 9, 2020, 5:24 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.