मुंबई - राज्यपालांनी दुसरा मोठा पक्ष म्हणून शिवसेनेला सत्तास्थापनेसाठी विचारणा केली असून, आजचा दिवस शिवसेनेसाठी कसोटीचा ठरणार आहे. बहुमतासाठी आवश्यक असलेला आकडा शिवसेनेकडे नाही. त्यामुळे राष्ट्रवादी शिवसेनेला पाठींबा देणार का असा प्रश्न विचारला असता, राष्ट्रवादी काँग्रेसचेअध्यक्ष शरद पवार यांनी, 'काँग्रेस-राष्ट्रवादीची निवडणुकपूर्व आघाडी आहे. त्यामुळे कोणताही निर्णय घ्यायचा झाल्यास तो देन्ही पक्षांमध्ये सविस्तर चर्चा करून घेतला जाईल' असे सुचक वक्तव्य केले आहे.
राज्यातील सत्ता स्थापनेचा अधिक क्लीष्ट होताना दिसून योत आहे. सेना-भाजप महायुतीने विधानसभा निवडणुक सोबत लढवली. मात्र, मुख्यमंत्रीपदावरून दोन्ही पक्षांमध्ये चालू असलेली खळबळ आता विकोपाला गेली आहे. सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपाने आम्ही सरकार स्थापन करण्यास असमर्थ आहोत, असे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना सांगितले आहे. त्यानंतर राज्यपालांनी दुसरा मोठा पक्ष म्हणून शिवसेनेला विचारणा केली असून दावा करण्यासाठी संध्याकाळी साडेसात पर्यंतची वेळ शिवसेनाला देण्यात आली आहे.
हेही वाचा - मुख्यमंत्री पदासाठी शिवसेना 'एनडीए'तून बाहेर पडणार का?
दरम्यान राष्ट्रवादी याविषयी सावध भूमिका घेताना दिसून येत आहे. खासदार सुप्रिया सुळेंनीही याप्रसंगी,'चर्चा झाल्यावर निर्णय घेऊ. अशा परिस्थितीत कसी बोलोले पोहिजे', असे म्हणत कुठलेही ठोस वक्तव्य करण्यास नकार दिला. तर दुसरीकडे, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनीही कुठल्याच पक्षासोबत अजून कुठलीही चर्चा झाली नसल्याचे स्पष्ट केले आहे. आज शरद पवार काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत. त्यानंतर चित्र स्पष्ट होईल अशी आशा आहे.शिवसेना बहुमताचा आकडा सिद्ध करण्यासाठी काय तडजोडी करते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या पाठिंब्यावर शिवसेनेची मदार असणार आहे. दुसरीकडे शिवसेनेला पाठिंबा द्यायचा की नाही यावरून काँग्रेसमध्ये दोन मतप्रवाह निर्माण झाले आहेत. त्यामुळे शिवसेनेला वेळेचा हात मिळणार का? यावर शिवसेनेचे मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न अवलंबून आहे.