ETV Bharat / state

Death Threat to Mukesh Ambani : 20 कोटी द्या नाहीतर...; उद्योगपती मुकेश अंबानी यांना जीवे मारण्याची धमकी, पोलिसांत गुन्हा दाखल - रिलायंस इंडस्ट्रीजचे अध्यक्ष

Death Threat to Mukesh Ambani : उद्योगपती मुकेश अंबानी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आलीय. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस तपास करत आहेत.

Death Threat to Mukesh Ambani
Death Threat to Mukesh Ambani
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 28, 2023, 9:52 AM IST

Updated : Oct 28, 2023, 10:12 AM IST

मुंबई Death Threat to Mukesh Ambani : रिलायंस इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आलीय. विशेष म्हणजे धमकी देणाऱ्या व्यक्तीनं मुकेश अंबानी यांच्याकडं 20 कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केलीय. तसंच जर पैसे दिले नाही तर जीवे मारु असं धमकी देणाऱ्यानं म्हटलंय. मुकेश अंबानींना ईमेलद्वारे धमकी आल्याची माहिती मिळत आहे. याप्रकरणी गावदेवी पोलिसांनी धमकी देणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करुन तपास सुरु केलाय. उद्योगपती मुकेश अंबानी यांना धमकी आल्यानं खळबळ उडालीय.

ईमेलमध्ये काय लिहिलंय : सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुकेश अंबानी यांच्या ईमेल आयडीवर अज्ञात व्यक्तीनं 27 ऑक्टोबर रोजी धमकीचा ईमेल पाठवला होता. त्यात लिहिलं होत की, 'तुम्ही आम्हाला 20 कोटी रुपये दिले नाही, तर आम्ही तुम्हाला मारुन टाकू, आमच्याकडं भारतातील सर्वोत्तम शूटर आहेत' असा मजकूर इंग्रजीत लिहिलेला होता. यानंतर मुकेश अंबानी यांच्या सुरक्षारक्षकाच्या तक्रारीवरुन मुंबईतील गावदेवी पोलिसांनी आयपीसीच्या कलम 387 आणि 506 (2) नुसार अज्ञात व्यक्तीविरुद्ध एफआयआर नोंदवून तपास सुरू केलाय.

यापूर्वीही अनेकदा धमकी : उद्योगपती मुकेश अंबानी व त्यांच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी येण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही अँटिलियाला बॉम्बनं उडवून देण्याच्या धमक्या देण्यात आल्या होत्या. तसंच मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकांनी भरलेली कारही जप्त करण्यात आली होती. यामुळं चांगलीच खळबळ उडाली होती.

अंबानींना उच्च दर्जाची सुरक्षा : मुकेश अंबानींना नेहमी येणाऱ्या धमक्या लक्षात घेऊन त्यांना Z+ सुरक्षा देण्यात आली होती. तर नीता अंबानी यांनाही Y+ दर्जाची सुरक्षा देण्यात आलीय. तसंच अंबानी कुटुंबाच्या घर आणि कार्यालयाच्या परिसरात सीआरपीएफ सुरक्षा पुरवत आहे.

हेही वाचा :

  1. Mukesh Ambani visited Badrinath Dham : उद्योगपती मुकेश अंबानींनी घेतलं बद्री-केदारचं दर्शन; मंदिर समितीला दिलं भरभरून दान
  2. Devendra Fadnavis Uddhav Thackeray : मुकेश अंबानींच्या निवासस्थानी देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरेंनी लावली हजेरी
  3. Jio Air Fiber on Ganesh Chaturthi : 'जिओ एअर फायबर'चं गणेश चतुर्थीला लाँचिंग - मुकेश अंबानींची घोषणा

Last Updated : Oct 28, 2023, 10:12 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.