ETV Bharat / state

मुंबईत गोपाळकाल्यासाठी दहीहंडीच्या सरावाला जोमाने सुरुवात - बालगोपाळ दहीहंडी

बालगोपाळासाठी दहीहंडी मोठा उत्साहाचा सण आहे. यादिवशी दहीहंडी फोडण्यासाठी थर लावताना अनेक अपघात होत असतात. त्यामुळे या थरांच्या उंचीवर अंकुश लावण्यात आला आहे. दहीहंडीच्या दिवशी कुठल्याही बालगोपाळाला दुखापत होऊ नये याकरता मुंबईतील प्रभादेवी मंडळ सरावाला लागले आहे.

मुंबईत गोपाळकाल्यासाठी दहीहंडीच्या सरावाला जोमाने सुरुवात
author img

By

Published : Aug 10, 2019, 1:38 PM IST

Updated : Aug 10, 2019, 3:20 PM IST

मुंबई - गोपाळकाला काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. यादिवशी अनेक गोविंदा दहीहंडी फोडण्यासाठी थर लावत असतात. त्यासाठी शहरातील प्रभादेवी येथील प्रभा-विनायक सोसायटीच्या यंग प्रभादेवी क्रिडा मंडळाच्या गोंविदांनी थर लावण्याचा सराव सुरू केला आहे.

मुंबईत गोपाळकाल्यासाठी दहीहंडीच्या सरावाला जोमाने सुरुवात

बालगोपाळासाठी दहीहंडी मोठा उत्साहाचा सण आहे. यादिवशी दहीहंडी फोडण्यासाठी थर लावताना अनेक अपघात होत असतात. त्यामुळे या थरांच्या उंचीवर अंकुश लावण्यात आला आहे. नियमांचे पालन करत दहीहंडीच्या दिवशी कुठल्याही बालगोपाळाला दुखापत होऊ नये तसेच सुरक्षितरित्या दहीहंडी साजरी करता यावी यासाठी प्रभादेवी मंडळ सरावाला लागले आहे. त्यासंबंधीचे मार्गदर्शन बालगोपाळांना करण्यात येत आहे.

सोसायटीच्या आवारात रात्री साडेनऊ ते 12 वाजेपर्यंत नियमितपणे चार ते पाच थरांचा सराव करण्यात येतो. यासाठी ३० ते ४० युवक हजर असतात. सराव करताना कोणालाही दुखापत होऊ नये यासाठी त्यांना बेल्ट आणि डोक्यात घालण्यासाठी हेल्मेट दिले जाते. तसेच जमिनीवर रबर मॅट, प्लास्टिक टाकण्यात येते असल्याचे त्यांचे प्रशिक्षक ऋग्वेद नाईक म्हणाले.

बालगोपाळांच्या सुरक्षिततेसाठी प्रत्येकाचा विमा देखील काढण्यात आला आहे. कोणाला दुखापत झाल्यास त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात येतात. तसेच दहीहंडीच्या माध्यमातून जमा झालेला निधी बालगोपाळांच्या खर्चासाठी वापरण्यात येतो, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष रवींद्र देसाई यांनी दिली.

मराठमोळा पारंपरिक सण असलेल्या दहीहंडी उत्सवाला स्पर्धात्मक दृष्टीकोनाने बघू नका. तसेच चढाओढ न करता प्रत्येक मंडळांनी दहीहंडी दिवशी खबरदारी घ्यावी. तसेच बालगोपाळांना दुखापत होणार नाही यासाठी सुरक्षिततेची साधने वापरावी, असे आवाहनन मंडळाच्यावतीने करण्यात आले. तसेच राज्य सरकारच्या नियमानुसार व न्यायालयाने जारी केलेल्या आदेशाचे पालन करूनच थरांची मर्यादा पाळणार असल्याचे मंडळाचे कार्यवाह किसन सारंग यांनी सांगितले.

Intro:मुंबई

मुंबई । दहीकाला काही दिवसावर येऊन ठेपला आहे. गोविंदा मंडळांचा थर लावण्याचा सराव सुरू झाला आहे. सरावासाठी नियोजन याबाबत प्रभादेवी येथील यंग प्रभादेवी क्रीडा मंडळाशी केलेली आमच्या प्रतिनिधी अक्षय गायकवाड यांनी केलेली बातचीत
Body:दहीहंडीला थर लावताना होणाऱ्या अपघातांना लगाम बसण्यासाठी थरांच्या उंचीवर अंकुश लावण्यात आला. या नियमांचे पालन करत दहीहंडीच्या दिवशी कोणत्याही बालगोपाळाला दुखापत होऊ नये, सुरक्षित दहीहंडी साजरी करता यावी यासाठी प्रभादेवीतील मंडळांनी सरावापासूनच खबरदारीचा उपाय म्हणून सुरक्षिततेची सर्व साधने वापरून सरावाला प्रारंभ केला आहे.

दहीहंडी म्हणजे बालगोपाळासाठी मोठा उत्साहाचा सण आहे. काही दिवसवरच दहीहंडी आल्याने अनेक विभागातून सरावाला सुरुवात झाला आहे.

प्रभादेवी येथील प्रभा-विनायक सोसायटीच्या यंग प्रभादेवी क्रीडा मंडळाने सरावाला सुरवात केली आहे. सरावा दरम्यान शिस्तीने दहीहंडीचे थर लावण्यात यावे तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीने घ्यावयाची काळजी नियम याबाबतचे मार्गदर्शन सरावाच्या प्रारंभीच सर्व गोपाळांना समजावून सांगण्यात येत आहे.

दहीहंडीच्या दिवशी सहजतेने हंडी फोडता यावी। सरावाअभावी कोणालाही दुखापत होऊ नये यासाठी साधारणतः 15 ते 20 दिवस अगोदर सराव शिबिरास सुरुवात करण्यात आली .

सोसायटीच्या मोकळ्या आवारात रात्री 9.30 ते 12 वाजेपर्यंत नियमितपणे चार ते पाच थरांचा सराव करण्यात येतो. सरावा दरम्यान ३० ते ४० युवक सरावासाठी हजर असतात.

सरावा दरम्यान कोणालाही दुखापत होऊ नये म्हणून मुलांच्या सुरक्षिततेसाठी त्यांना बेल्ट तसेच डोक्यात घालण्यासाठी हेल्मेट दिले जाते व जमिनीवर रबर मॅट, प्लास्टिक टाकण्यात येते अशी माहिती टीम प्रशिक्षक ऋग्वेद नाईक यांनी दिली.

बालगोपाळांच्या सुरक्षिततेसाठी प्रत्येकाचा विमा काढला असून कोणाला दुखापत झाली तर फर्स्टएड कीट बाळगण्यात येते तर दहीहंडीच्या माध्यमातून जमा झालेला निधी बालगोपालांच्या खर्चासाठी वापरण्यात येतो अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष रवींद्र देसाई यांनी दिली .

राज्य शासनाच्या नियमानुसार व न्यायालयाने जारी केलेल्या आदेशाचे पालन करूनच थरांची मर्यादा पाळणार असल्याचे मंडळाचे कार्यवाह किसन सारंग यांनी सांगितले.

मराठमोळा पारंपारिक सण असलेल्या दहीहंडी या उत्सवाला स्पर्धात्मक दृष्टीकोन न बाळगता तसेच चढाओढ न करता प्रत्येक मंडळांनी दहीहंडी दिवशी खबरदारी घेत बालगोपाळांचा सुरक्षिततेसाठी सुरक्षिततेची साधने वापरावी जेणेकरून कोणाला दुखापत होणार नाही असे आव्हान मंडळाच्या वतीने करण्यात आले
Conclusion:
Last Updated : Aug 10, 2019, 3:20 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.