ETV Bharat / state

Drug Destroyed In Mumbai: सीमाशुल्क विभागाने 1500 कोटींचे अंमली पदार्थ केले नष्ट - Drug Destroyed In Mumbai

तळोजा येथील 'वेस्ट मॅनेजमेंट लिमिटेड' कंपनीच्या सीमाशुल्क (कस्टम) विभागाच्या पथकाच्या माध्यमातून तब्बल 1500 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ नष्ट करण्यात आले आहेत. हे अंमली पदार्थ (ड्रग्ज) 'एनडीपीएस कोर्टा'ची परवानगीनंतर नष्ट करण्यात आले.

Drug Destroyed In Mumbai
ड्र्ग नष्ट करताना कर्मचारी
author img

By

Published : May 26, 2023, 6:29 PM IST

सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्याची प्रतिक्रिया

नवी मुंबई: सीमाशुल्क विभागाकडून वेळोवेळी अशाप्रकारे अंमली पदार्थ नष्ट करण्याचे काम सुरू असते. विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ. श्रीधर धुमाळ यांनी सांगितले की, आज आम्ही सुमारे 1500 कोटी रुपयांचे सुमारे 350 किलो अंमली पदार्थ नष्ट केले आहेत.

350 किलो ड्रग्ज नष्ट: मुंबई सीमा शुल्क विभाग कक्ष 3 च्या माध्यमातून 350 किलो ड्रग्ज जप्त करण्यात आले. यामध्ये 9 किलो कोकेन, साडे 16 किलो हेरॉईन, 190 किलो मेटामाईन, 100 किलो गांजा, मँड्राक्स टॅब्लेट, एमडीएमए 298 टॅब्लेट अशा तब्बल 350 कोटी ड्रग्जची विल्हेवाट लावली गेली. या अंमली पदार्थाची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत 1500 कोटी रुपये इतकी आहे.

कचरा व्यवस्थापनासाठी मुंबई सुरक्षित ठिकाण: ही कारवाई डीआरआय, विमानतळ आयुक्तालय आणि कुरिअर विभागाने केली आहे. यामध्ये कोकेन, हेरॉइन, मेथामाइन, गांजा, मँड्राक्स टॅब्लेट, एमडीएमए ड्रग्जचा समावेश होता. श्रीधर धुमाळ यांनी सांगितले की, मुंबई कचरा व्यवस्थापन हे सर्वांत सुरक्षित ठिकाण आहे. येथे ड्रग्ज सहज नष्ट करता येतात. म्हणून आम्ही येथे येऊन हे अंमली पदार्थ नष्ट केले आहे.

मुंबईतून ड्रग जप्त: मुंबई क्राईम ब्रँचच्या युनिट १२ ने मुंबईतील अंधेरी आणि जोगेश्वरी परिसरातून २ ड्रग्ज तस्करांना 5 मे, 2023 रोजी अटक केली. त्यांच्याकडून आंतरराष्ट्रीय बाजारात ७१ लाख रुपये किमतीचे ड्रग्ज जप्त करण्यात आले. पोलिसांनी त्यांच्या विरोधात थौहार कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. त्यांना कोर्टात हजर केले असता, कोर्टाने ६ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

ड्रग्ज तस्करांना अटक: मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थांचा वावर मोठ्या प्रमाणावर आहे. अमली पदार्थ तस्करांना अटक केल्याच्या बातम्या आपण नेहमीच ऐकत असतो. गुन्हे शाखा युनिट १२ कडून मिळालेल्या माहितीनुसार, २९ एप्रिल रोजी अंधेरी पूर्वेतील मरोळ पाईपलाइन परिसरातून २९ वर्षीय व्यक्तीला २० लाखांच्या ड्रग्जसह अटक करण्यात आली होती. चौकशीदरम्यान ३ मे रोजी एका ३२ वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली होती. जोगेश्वरी पूर्व येथील राम मंदिर रोडला ३०० ग्रॅम ७१ लाख रुपयांचे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे.

हेही वाचा:

  1. Thane Crime: इराणी कबिल्यातील सुंदरी निघाली ड्रग डीलर; एमडी ड्रग्जसह चरस हस्तगत
  2. Molestation Case : अमृता फडणवीसांचा 'तो' व्हिडिओ दुसऱया महिलेला पाठवणे पडले महागात; तरुणावर विनयभंगाचा गुन्हा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.