मुंबई - राज्यभरातील 47 कारागृहांमधील 43 हजार 710 कैद्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. ज्यामध्ये आतापर्यंत 2609 कोरोना संक्रमित रुग्ण आढळले असून 7 कैद्यांचा मृत्यू झाला आहे. आत्तापर्यंत 2569 कैदी उपचार घेऊन पूर्णपणे बरे झाले आहेत. दुसरीकडे राज्यातील 47 कारागृहातील 3326 कारागृह कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली असून यामध्ये 573 कारागृह कर्मचारी हे करुणा संक्रमित आढळून आलेले आहेत आतापर्यंत आठ कारागृह कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून 547 कारागृह कर्मचारी हे उपचारानंतर करून आतून पूर्णपणे बरे झालेले आहेत.
राज्यभरातील 46 कारागृहांमध्ये 23 हजार 217 कैद्यांना ठेवण्याची क्षमता आहे. मात्र कोरोना संक्रमणाच्या काळामध्ये तब्बल 33,122 कैदी कारागृहात ठेवण्यात आलेले आहेत. सध्याच्या घडीला येरवडा कारागृहामध्ये 2449 कैद्यांची क्षमता असताना सर्वाधिक 5760 कधी या ठिकाणी ठेवण्यात आले आहेत. औरंगाबाद कारागृहाची क्षमता 539 कैद्यांची असताना या ठिकाणी सध्याच्या घडीला 1247 कैदी ठेवण्यात आलेले आहेत. मुंबई मध्यवर्ती कारागृहात 804 कैद्यांची क्षमता असताना या ठिकाणी 2547 कैदी ठेवण्यात आलेले आहेत. तर ठाणे मध्यवर्ती कारागृहाची क्षमता 1105 कैद्यांची असताना या ठिकाणी तब्बल 3470 कैदी ठेवण्यात आलेले आहेत. तळोजा कारागृहात 2124 कैद्यांची क्षमता असताना 3644 कैदी या ठिकाणी ठेवण्यात आले असून कल्याण जिल्हा कारागृहाची क्षमता 540 कैद्यांची असताना या ठिकाणी 1923 कैदी ठेवण्यात आलेले आहेत. नागपूर मध्यवर्ती कारागृहात 1810 कैद्यांची क्षमता असताना या ठिकाणी 2394 कैदी ठेवण्यात आले आहेत. अमरावती मध्यवर्ती कारागृहाची क्षमता 943 कैद्यांची असताना या ठिकाणी 991 कैदी ठेवण्यात आले आहेत.
कैद्यांमध्ये कोरोना पसरू नये
कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्यामुळे कारागृहातील कैद्यांमध्ये कोरोना पसरू नये, यासाठी तब्बल 5105 कैद्यांना तात्पुरता जामीन देऊन सोडण्यात आलेले आहे. याबरोबरच आपत्कालीन पॅरोलवर 2664 कायद्यांना सोडण्यात आलेले असून उच्च स्तरीय समितीकडून करण्यात आलेल्या शिफारशीनुसार 3019 कैद्यांना तात्पुरत्या जामिनावर सोडण्यात आलेले आहे. आतापर्यंत राज्यभरातील एकूण 10788 कैद्यांना तात्पुरत्या जामिनावर सोडून देण्यात आलेले आहे.