शताब्दी रुग्णालयातून गायब झालेल्या कोरोनाग्रस्त रुग्णाचा मृतदेह सापडला रेल्वे स्थानकात - मुंबई महापालिका दवाखाना बातमी
मुंबईत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. कोरोनाच्या रुग्णांवर महापालिकेच्या तसेच खासगी रुग्णालयात उपचार केले जात आहेत. पालिकेच्या कांदिवली येथील शताब्दी रुग्णालयात 80 वर्षीय रूग्णावर कोरोनाचे उपचार सुरू होते. सोमवारी (दि.8 जून) सकाळपासून हे वयोवृद्ध रुग्ण रुग्णालयातून बेपत्ता होते. त्यांचा शोध घेतला जात होता.
मुंबई - महानगरपालिकेच्या रुग्णालयात कोरोनाचे मृतदेह वॉर्डमध्ये पडून असल्याचे प्रकार नेहमीच समोर येत आहेत. त्यात आता पालिकेच्या शताब्दी रुग्णालयातून एक वयोवृद्ध कोरोना रुग्ण बेपत्ता झाला होता. त्यांचा मृतदेह बोरिवली रेल्वे स्थानकावर सापडला आहे. यामुळे रुग्णालयाची सुरक्षा बेभरोसे असल्याचे समोर आले आहे.
मुंबईत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. कोरोनाच्या रुग्णांवर महापालिकेच्या तसेच खासगी रुग्णालयात उपचार केले जात आहेत. पालिकेच्या कांदिवली येथील शताब्दी रुग्णालयात 80 वर्षीय वृद्ध कोरोनावर उपचार घेत होते. सोमवारी (दि.8 जून) सकाळपासून हे वयोवृद्ध रुग्ण रुग्णालयातून बेपत्ता होते. त्यांचा शोध घेतला जात होता. अखेर बोरिवली रेल्वे स्थानकावर त्यांचा मृतदेह सापडला आहे. रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे आजोबांचा जीव गेल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.
हे वयोवृद्ध रुग्ण कांदिवली येथील शताब्दी रुग्णालयातून बोरिवली रेल्वे स्थानकात कसे पोहचले, त्यांना रुग्णालयातून बाहेर जाताना सुरक्षा रक्षकांनी अडवले कसे नाही, त्यांच्यावर उपचार सुरू असताना रुग्णालय प्रशासनाने त्यांना बाहेर कसे जाऊ दिले, त्यांचा मृत्यू कसा झाला आदी अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. या प्रकारामुळे शताब्दी रुग्णालयाच्या कारभारावर प्रश्न उपस्थित झाले आहेत. दरम्यान, रुग्णालयाला मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर या भेट देणार असून त्या संबंधितांवर कारवाईचे आदेश देण्याची शक्यता आहे.