मुंबई - विधानसभा निवडणुकीसाठी मागील अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाआघाडीतील जागावाटपाचा प्रश्न आता जवळजवळ सुटला असल्याचा दावा दोन्ही पक्षांनी केला आहे. यासंदर्भातील अंतिम घोषणा दोन्ही पक्षांकडून महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या दिवशी म्हणजे २ ऑक्टोबरला केली जाणार आहे. या महाआघाडीतील मित्रपक्ष हे आपल्या सोबत यादिवशी येणार असल्याचा दावा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून करण्यात आला आहे.
काँग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची आज (रविवार) मुंबईत बैठक पार पडली. या बैठकीमध्ये दोन्ही पक्षांकडून प्रत्येकी 125 जागांवर लढण्याची निश्चित झाले आहे. मात्र, इतर काही चार जागांवर अद्याप तिला सुटला नसल्याची कबुली काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी माध्यमांशी बोलताना दिली. या चार जागेचा प्रश्न चालूच राहणार आहे. मात्र, इतर जागांबद्दल बरेच एकमत झाल्याचे ते म्हणाले. त्यामुळेच आम्ही २ ऑक्टोबरला एकत्र येत असून त्या दिवशी आम्ही या विषयीची घोषणा करणार असल्याचेही थोरात म्हणाले.
हेही वाचा - शरद पवारांवर गुन्हा दाखल करणे ही राजकीय कृती - बाळासाहेब थोरात
उद्या (सोमवर) मी माझा उमेदवारी अर्ज दाखल करणार असून काँग्रेसची पहिली यादी आज जाहीर होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. जागा आदलाबदली संदर्भात आम्ही दोन्ही पक्षांनी एक समन्वयाची भूमिका घेतली असल्याचे थोरात यांनी सांगितले. मात्र, राष्ट्रवादीकडून विदर्भातील तीन जागांवर आपला दावा केला असल्याने या जागावाटपाचा तिढाही दोन ऑक्टोबरपर्यंत सुटेल की नाही, अशी शंकाही व्यक्त केली जात आहे. त्यासोबतच दोन तारखेला महाआघाडीच्या घोषणेनंतर आघाडीचा संयुक्त जाहीरनामा आणि उर्वरित पक्षांच्या उमेदवारांची यादी ही जाहीर केली जाणार आहे.
हेही वाचा - काँग्रेसची ५१ उमेदवारांची पहिली यादी जाहीर