ETV Bharat / state

पंतप्रधान प्रचारजीवी आहेत, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पटोले यांची टीका - मुंबई भाजप बातमी

भाजप नेते ज्याप्रकारे संचारबंदी व मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या पॅकेजला विरोध करत आहेत. मात्र, त्यांना पॅकेजवर बोलण्याचा काहीही अधिकार नाही, असा टोला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी लगावला आहे.

नाना पटोले
नाना पटोले
author img

By

Published : Apr 14, 2021, 7:38 PM IST

मुंबई - घरा-घरात माणसे मरत आहेत आणि विरोधी पक्षाचे नेते राजकारणात दंग आहेत. आम्ही लोकांचे जीव वाचवण्याचे काम करत आहोत. मात्र, विरोधक खुर्चीसाठी राजकारण करत असल्याचा गंभीर आरोप नाना पटोले यांनी केला. मोदी हे प्रचारजीवी आहेत. ते मास्क न घालता प्रचार करत सुटले आहेत आणि लोकांना मास्क घाला म्हणून सांगत आहेत. भाजप मेलेल्या माणसाच्या टाळूवरील लोणी खात आहे, अशा शब्दात नाना पटोले यांनी भाजपवर कडाडून टीका केली आहे.

बोलताना प्रदेशाध्यक्ष नाना पटोले

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंधरा दिवसांची संचारबंदीची घोषणा केली आहे. या काळात कठोर निर्बंध लावण्यात आले आहेत. दरम्यान, राज्य सरकारच्या या निर्णयावर आणि हातावर पोट असलेल्या लोकांसाठी जाहीर केलेल्या पॅकेजवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी जोरदार टीका केली आहे. विरोधकांच्या टीकेला आता कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

पॅकेजबाबत बोलण्याचा विरोधकांना अधिकार नाही

काँग्रेस हा पक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर चालणारा पक्ष असून कायम त्यांचे विचार अंमलात आणणारा पक्ष आहे. कोरोना काळात अनेक गोष्टींची गरज लागते. त्यामुळे आज (दि. 14 एप्रिल) काँग्रेस पक्षाकडून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे, असे नाना पटोले यांनी सांगितले. लॉकडाऊन आणि पॅकेजबाबत विरोधकांना बोलण्याचा काहीही अधिकार नाही. भाजप ज्या प्रकारे विरोध करत आहेत ती खेदाची बाब आहे, असेही नाना पटोले यांनी सांगितले.

हेही वाचा - 'मुख्यमंत्र्यांनी जनतेच्या तोंडाला पाने पुसली'

हेही वाचा - 'मुख्यमंत्र्यांनी राज्यात अप्रत्यक्षपणे लॉकडाऊनच जाहीर केला आहे'

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.