ETV Bharat / state

Balasore Train Accident : बालासोर रेल्वे अपघात प्रकरणी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव राजीनामा द्या - पृथ्वीराज चव्हाण - अटलबिहारी वाजपेयी

बालासोर रेल्वे अपघात दुर्दैवी आहे. या अपघातात आतापर्यंत तब्बल 268 नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे अपघाताची जबाबदारी घेऊन रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी काँग्रेसनेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.

Prithviraj Chavan Demand Ashwini Vaishnaw Resign
काँग्रेसनेते पृथ्वीराज चव्हाण
author img

By

Published : Jun 3, 2023, 1:53 PM IST

मुंबई : ओडिशातील बालासोर जिल्ह्यामधील बहनगा रेल्वे स्थानकाजवळ भीषण रेल्वे अपघात घडला आहे. तीन ट्रेनच्या घडलेल्या या विचित्र अपघातात शुक्रवारी सायंकाळी तब्बल 268 नागरिकांचा बळी गेला आहे. तर 900 प्रवासी जखमी झाल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे. राज्यातील सर्वच राजकीय नेत्यांनी रेल्वे दुर्घटनेबाबत संवेदना व्यक्त केल्या आहेत. तर अपघाताची जबाबदारी स्वीकारून रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.

सरकारने काळजी घ्यावी : बालासोरजवळ झालेल्या भीषण रेल्वे अपघातात 268 नागरिकांना आपला जीव गमवावा लागला. यातील पीडित कुटुंबियांबाबत मी शोक व्यक्त करतो. माझ्या संवेदना व्यक्त करतो. नागरिकांना त्वरीत दिलासा मिळावा, त्यांच्या प्रवासाची आणि मुक्कामाची सरकारने काळजी घेतली पाहिजे, असे मत पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले. पीडित कुटूंब आधीच प्रभावित झाले आहेत. त्यांना जास्त फटका बसणार नाही, याची सरकारने काळजी घ्यावी, असा सल्लाही पृथ्वीराज चव्हाण यांनी दिला.

चौकशी समिती अहवाल लवकर जाहीर करा : रेल्वे अपघात संदर्भात एक उच्च समिती गठीत करण्यात आली आहे. अपघाताची चौकशी ही समिती करेल. त्यासोबत रेल्वे कमिशनर कमिटीलाही पाचारण करण्यात आले आहे. तेही अपघाताची समांतर चौकशी करतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. अपघाताला कारणीभूत गोष्टींची माहिती या समितीच्या वतीने घेतली जाईल. रेल्वेने जी चौकशी समिती स्थापन केली आहे, त्याचा अहवाल लवकरात लवकर जाहीर करावा, आमची मागणी असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. एखादी दुर्दैवी दुर्घटना घडली तर देशातील जनतेला सत्य कळले पाहिजे. हा मोठा रेल्वे अपघात असून, चौकशी समितीचा अहवाल लवकर प्रसिद्ध करावा. उपकरणे सदोष होती का, ही तांत्रिक समस्या होती का? लोकांना सर्व गोष्टी कळल्या पाहिजे, असेही पृथ्वीराज चव्हाण यावेळी म्हणाले.

पंतप्रधान मोदींनीही करावे पालन : कारगिल युद्धाच्या वेळी अटलबिहारी वाजपेयी यांनी असाच पाठपुरावा केला होता. त्यांनी सुब्रमण्यम स्वामी यांना चौकशी समितीचे प्रमुख बनवून अहवाल प्रकाशित केला होता. त्यावर एक पुस्तक उपलब्ध आहे आणि तुम्ही ते वाचू शकता. काही चुका झाल्या होत्या हे त्यांनी मान्य केले होते. त्या पुन्हा होणार नाहीत, याची आम्ही काळजी घेऊ असेही पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी म्हटले होते. त्याप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही याचे पालन करावे, असा सल्लाही पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी दिला आहे.

सार्वजनिक डोमेनवर माहिती मिळावी : वंदे भारत कार्यक्रम केल्यामुळे आपण रेल्वे सुरक्षेकडे दुर्लक्ष करत आहोत का? दर चौथ्या दिवशी वंदे भारत कार्यक्रम केला जातो. ती 16 डब्यांची ट्रेन आहे पण ते फक्त ट्रेन दुप्पट करण्यासाठी 8 डब्यांची ट्रेन चालवत आहेत. मात्र आपण रेल्वे सुरक्षेला गांभीर्याने घेत नाही, त्याकडे दुर्लक्ष करत आहोत का? रेल्वे अर्थसंकल्प संपला, त्यामुळे आता त्याची चर्चाही होत नाही. रेल्वेमध्ये सुरक्षेपेक्षा महत्त्वाचे काहीही नाही, बजेट नाही. त्यामुळे वार्षिक रेल्वे अहवाल आला पाहिजे आणि सार्वजनिक डोमेनवर चर्चा झाली पाहिजे, असेही पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राजीनामा स्वीकारतील का : दुर्दैवी अपघात असल्याने रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी परंपरेनुसार राजीनामा द्यावा. पंतप्रधान मोदी तो राजीनामा स्वीकारणार नसले, तरी त्यांनी किमान प्रस्ताव तरी द्यावा, असेही त्यांनी यावेळी सांगितले. मी पुन्हा शोक व्यक्त करतो आणि पीडितांबद्दल माझी सहानुभूती व्यक्त करतो, असेही पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी स्पष्ट केले.

हेही वाचा -

  1. NCP camp in Nagpur : मविआ जागावाटपाबाबत अद्याप चर्चा नाही, अजित पवारांची स्पष्टोक्ती, आजपासून नागपुरात राष्ट्रवादीचे चिंतन शिबिर
  2. Sanjay Raut ः भाजपसोबत सूत जुळवण्याचा प्रयत्न केला नाही, संजय राऊत यांची स्पष्टोक्ती
  3. Gopinath Munde Death Anniversary : भ्रष्टाचाराचे आरोपी भाजपच्या मंत्रिमंडळात; पक्षाची पायाभरणी करणाऱ्यांवर अन्याय, खडसेंचा हल्लाबोल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.