ETV Bharat / state

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन - मुंबई लेटेस्ट न्यूज

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे आणि त्यांच्या पालकांचे अभिनंदन केले आहे.

Chief Minister Uddhav Thackeray
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे
author img

By

Published : Jul 29, 2020, 4:25 PM IST

मुंबई - दहावीची परीक्षा शिक्षणाच्या वाटचालीतील एक टप्पा आहे. या टप्प्यावर प्रयत्नपुर्वक मिळवलेल्या यशाचा आनंद निश्चित मोठा असतो. त्यासाठी तुमचे मनःपूर्वक अभिनंदन अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे आणि त्यांच्या पालकांचे अभिनंदन केले आहे. तसेच या सर्वांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या आहेत.

मुख्यमंत्री अभिनंदन संदेशात म्हणतात, कोणत्याही वाटचालीत एक महत्त्वाचा टप्पा असतो. तशी ही दहावीची परीक्षा एक टप्पा आहे. त्यामध्ये क्षमता सिद्ध करण्यासाठी तुम्ही जाणीवपूर्वक प्रय़त्न करता. अशा प्रयत्नपुर्वक मिळवलेल्या यशाचा आनंद हा निश्चितच मोठा असतो. त्यामुळे या प्रयत्नांसाठी आणि यशासाठी तुमचे आणि पालकांचे मनःपूर्वक अभिनंदन. तसेच भावी वाटचालीसाठीही शुभेच्छा.

काहींना या परीक्षेत अपेक्षित यश मिळाले नसेलही. त्यांनी आणखी प्रयत्न करावेत. यश तुमचेच असेल, गरज असेल, ती फक्त आणखी जोमाने प्रयत्न करण्याची. त्यासाठीही शुभेच्छा. निकाल काहीही असेल तो आनंदाने स्वीकारा. शिक्षणाने आपण समाजाचा, देशाचा विकास घडवून आणू शकतो. त्यासाठी कटीबद्ध राहू या.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.