मुंबई - देशातील पहिले पोलीस साहित्य संमेलन आज मोठ्या दिमाखात मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर या ठिकाणी पार पडले. या कार्यक्रमात जेष्ठ हास्य कवी अशोक नायगावकर यांची उपस्थिती होती. यावेली बोलताना नायगावकर यांनी पोलिसांचे तोंड भरून कौतुक केले.
पोलिसांच्या कार्यासारखे कुणाचेचकार्य नाही. अखिल भारतीय समेंलनापेक्षा भारी मुंबई पोलिसांचे संमेलन भरलेआहे. शासनाने पोलिसांच्या साहित्य संमेलनाला अनुदान द्यावे.पोलिसांनी आपली ही कला जपून हा कार्यक्रम आयोजित केला आहे. या कलेत खरच त्यांचेप्रतिबिंब दिसत असेल तर नक्कीच सर्वांनी ते पाहायला पाहिजे, असे अशोक नायगावकर म्हणाले.
यावेळी अशोक नायगावकर यांनी आपल्या कवितांनी साहित्य संमेलन गाजविले.