मुंबई - महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा प्रभाव वाढत आहे. अशातच महाराष्ट्रात कोरोनाने आणखी एक बळी घेतला आहे. नवी मुंबईतील वाशी खासगी रूग्णालयात या कोरोना बाधिताचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांसाठी संपूर्ण भारत लॉकडाऊन असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व जीवनावश्यक वस्तूंची दुकाने, किराणा दुकाने, औषधांची दुकाने 24 तास सुरू ठेवण्याची परवानगी दिली आहे.
-
"सर्व जीवनावश्यक वस्तूंची दुकाने, किराणा दुकाने, औषधांची दुकाने यांना २४ तास उघडे ठेवण्याची परवानगी देण्यात येत आहे."
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) March 26, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
-मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे
">"सर्व जीवनावश्यक वस्तूंची दुकाने, किराणा दुकाने, औषधांची दुकाने यांना २४ तास उघडे ठेवण्याची परवानगी देण्यात येत आहे."
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) March 26, 2020
-मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे"सर्व जीवनावश्यक वस्तूंची दुकाने, किराणा दुकाने, औषधांची दुकाने यांना २४ तास उघडे ठेवण्याची परवानगी देण्यात येत आहे."
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) March 26, 2020
-मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे
आज वर्षा येथे कोरोना उपयाययोजनांच्या संदर्भात मंत्रालय नियंत्रण कक्षाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली त्यावेळी यावर चर्चा करण्यात आली. लॉकडाऊन मुळे लोकांना जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी गर्दी करावी लागत आहे. त्यामुळे त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ नये, तसेच त्यांना जीवनावश्यक वस्तू, अन्न धान्य खरेदी करता यावे, म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, संबंधित दुकानांनी ग्राहकांच्या आरोग्याची काळजी घेणे, आवश्यक आहे. 2 ग्राहकांमधील अंतर, निर्जंतुकीकरण, स्वच्छता या बाबत शासनाने घालून दिलेल्या मार्गदर्शन सूचना पाळाव्यात, असेही यासंदर्भात झालेल्या बैठकीत ठरले आहे.
-
कोरोना उपयाययोजना संदर्भात आज मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी वर्षा येथे वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. बंदिस्त वातावरण टाळून आणि अधिकाऱ्यांच्या बैठक व्यवस्थेत योग्य अंतर ठेवून ही बैठक घेण्यात आली. pic.twitter.com/NSAPL8tQN1
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) March 26, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">कोरोना उपयाययोजना संदर्भात आज मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी वर्षा येथे वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. बंदिस्त वातावरण टाळून आणि अधिकाऱ्यांच्या बैठक व्यवस्थेत योग्य अंतर ठेवून ही बैठक घेण्यात आली. pic.twitter.com/NSAPL8tQN1
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) March 26, 2020कोरोना उपयाययोजना संदर्भात आज मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी वर्षा येथे वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. बंदिस्त वातावरण टाळून आणि अधिकाऱ्यांच्या बैठक व्यवस्थेत योग्य अंतर ठेवून ही बैठक घेण्यात आली. pic.twitter.com/NSAPL8tQN1
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) March 26, 2020
तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे ठिकठिकाणी अडकून पडलेल्या ट्रकचालकांना इच्छितस्थळी पोहोचण्यासाठी ट्रकवाहतुकीलाही परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील मालवाहू ट्रकवाहतूक पुन्हा सुरू होऊ शकेल. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केल्यानंतर रिकाम्या परतणाऱ्या वाहनांना पोलिसांकडून अडविण्यात येणार नाही, असा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात झालेल्या बैठकीतही घेण्यात आला आहे.