ETV Bharat / state

नीरजच्या मन-मनगटात विश्वासाची समर्थ साथ; अंगावर रोमांच! मुख्यमंत्री, पवारांकडून गोल्डन बॉयवर कौतुकाचा वर्षाव - अजित पवार नीरज चोप्रा अभिनंदन

ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या नीरज चोप्रावर आता देशभरातून कौतुकाचा पाऊस पडू लागला आहे. महाराष्ट्रातून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शरद पवार, देवेंद्र फडणवीस यांनीही नीरजचे कौतुक केले आहे.

niraj
niraj
author img

By

Published : Aug 7, 2021, 8:20 PM IST

Updated : Aug 7, 2021, 9:34 PM IST

मुंबई - टोकियो ऑलिम्पिकमध्ये भालाफेकमध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या नीरज चोप्रावर आता देशभरातून कौतुकाचा पाऊस पडू लागला आहे. आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही नीरजचे अभिनंदन केले आहे.

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

उद्धव ठाकरेंकडून नीरजचे अभिनंदन
उद्धव ठाकरेंकडून नीरजचे अभिनंदन

'ऑलिम्पिकमधील भारतीयांच्या सहभागाचा आनंद द्विगुणित करणारी, क्रीडा विश्वाचा आत्मविश्वास दुणावणारी कामगिरी नीरज चोप्रा याने केली आहे. भालाफेकीसाठी नीरजच्या मन आणि मनगटात विश्वासाची, समर्थ साथ यांची ताकद भरणाऱ्या त्याच्या कुटुंबियांसह, मार्गदर्शक, प्रशिक्षक यांचेही मनःपूर्वक अभिनंदन. नीरज आम्हाला तुझा अभिमान आहे. नीरज चोप्रा याच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा', असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

नीरजने शानदार सुवर्णपदकाने नवा इतिहास लिहिला - शरद पवार

शरद पवारांकडून नीरजचे अभिनंदन
शरद पवारांकडून नीरजचे अभिनंदन

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही नीरज चोप्राचे अभिनंदन केले आहे. 'टोक्यो ऑलिंम्पिकमध्ये पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेत सुवर्णपदक मिळविल्याबद्दल नीरज चोप्रा याचे मनपूर्वक अभिनंदन! भारतीय ॲथेलेटिक्समध्ये त्याने या शानदार सुवर्णपदकाने नवा इतिहास लिहिला आहे!', असे शरद पवार यांनी म्हटले आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रीया सुळे यांनीही नीरजचे अभिनंदन केले आहे. त्यांनी त्यांचे वडिल शरद पवार यांची ट्विट रिट्विट केले आहे.

नीरजनं इतिहास रचला- अजित पवार

अजित पवारांकडून नीरजचे अभिनंदन
अजित पवारांकडून नीरजचे अभिनंदन

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही नीरजचे अभिनंदन केले आहे. 'टोकियो ऑलिम्पिकमध्ये ८७.५८ मी. भाला फेकून स्पर्धेतलं ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकणाऱ्या नीरज चोप्राचं मनःपूर्वक अभिनंदन! देशाला मैदानी खेळांमधलं पहिलं वैयक्तिक सुवर्णपदक जिंकून देणाऱ्या नीरजनं आज इतिहास रचला आहे. त्याच्या कामगिरीनं देशातील मैदानी खेळांच्या सुवर्णयुगाची सुरुवात झाली आहे', असे अजित पवार यांनी म्हटले आहे.

अंगावर रोमांच - देवेंद्र फडणवीस

देवेंद्र फडणवीसांकडून नीरजचे अभिनंदन
देवेंद्र फडणवीसांकडून नीरजचे अभिनंदन

महाराष्ट्रातील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही नीरजचे अभिनंदन केले आहे. 'अंगावर रोमांच! राष्ट्रगीत आणि भावनांचा तो सूर, चमकणारे सोन्यासारखे नीरजचे डोळे... 1.3 अब्ज भारतीयांना नीरजचा अभिमान', असे फडणवीसांनी म्हटले आहे. तसेच, सुवर्णपदक जिंकल्यानंतर राष्ट्रगीत झाले. याचा व्हिडिओही फडणवीसांनी ट्विट केला आहे.

नीरजची ऐतिहासिक कामगिरी

भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्राने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. त्याने अ‍ॅथलेटिक्समधील भारताचा सुवर्ण पदकाचा दुष्काळ संपवला आहे. टोकियो येथील ऑलिम्पिकमध्ये भालाफेकच्या अंतिम फेरीत नीरजने सुवर्ण पदक जिंकलं आहे. त्याने पहिल्या व दुसऱ्या प्रयत्नातच एवढ्या लांब भाला फेकला की प्रतिस्पर्धींनी सुवर्णपदकाची अपेक्षाच सोडली. दरम्यान, अ‍ॅथलेटिक्स प्रकारात भारतीय खेळाडूने जिंकलेले हे पहिले पदक आहे.

पात्रता फेरीत नीरजने फेकला 86 मीटर लांब भाला

नीरज सद्या तुफान फार्मात आहे. त्याने टोकियो ऑलिम्पिकमधील पात्रता फेरीत 86.65 मीटर लांब भाला फेकला. तो पात्रता फेरीत ग्रुप ए आणि ग्रुप बी मिळून पहिल्या स्थानावर होता. नीरजचे सर्वोत्कृष्ट प्रदर्शन 88.06 इतके आहे. त्याने हा थ्रो आशियाई क्रीडा स्पर्धेत केला होता. त्यावेळी तो सुवर्ण विजेता ठरला.

जर्मन प्रशिक्षकाकडून घेतली ट्रेनिंग -

नीरज चोप्रा हा भालाफेकचा सराव जर्मन प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनात करत आहेत. जर्मनचे क्लाउस बार्तोनित्स हे त्याचे प्रशिक्षक आहेत. क्लाउस यांच्या मार्गदर्शनात नीरज चोप्राच्या कामगिरीत दिवसागणित सुधारणा होत असल्याचे पाहायला मिळत आहे.

5 सुवर्ण पदकाचा मानकरी नीरज चोप्रा

इंडियन आर्मीत काम करणारा नीरज चोप्रा याने आतापर्यंत 5 मोठ्या स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकलं आहे. त्याने आशियाई क्रीडा स्पर्धा, राष्ट्रकुल, आशियाई चॅम्पियनशीप, साउथ आशियाई क्रीडा स्पर्धा, वर्ल्ड ज्यूनियर चॅम्पियनशीपमध्ये सुवर्ण पदक जिंकलं आहे.

वजन कमी करण्यासाठी आला आणि भालाफेकपटू बनला

नीरज चोप्रा हरियाणाचा पानीपत जिल्ह्याचा रहिवाशी आहे. त्याला आपलं वजन कमी करायचे होते. यामुळे तो अॅथलिटिक्समध्ये आला. त्यानंतर त्याने ग्रुप एज स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी केली. यात त्याने अनेक स्पर्धा जिंकल्या. यानंतर नीरजने भालाफेकमध्ये करियर केलं. 2016 मध्ये त्याने इंडियन आर्मी जॉईन केली.

हेही वाचा - यंदा ऑलिम्पिकध्ये देशाला पहिले सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या नीरज चोप्राने 'ही' दिली प्रतिक्रिया

Last Updated : Aug 7, 2021, 9:34 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.