मुंबई : जत तालुक्यातील काही गावांना कर्नाटक सरकारने पाणी सोडल्यानंतर काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी (CM Eknath Shinde instructions) तातडीची बैठक सायंकाळी सह्याद्री अतिथी गृह बोलवली होती. या बैठकीत म्हसळा उपसा सिंचन योजना तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले (prepare Upsa irrigation scheme in Jat taluka) आहेत. या उपसा सिंचन योजनेतून जत तालुक्यातील गावांना पाणी प्रश्न सुटणार आहे. त्यामुळे तातडीने या योजनेचे काम करावे तसेच योजनेसाठी समन्वय साधण्यात यावा, अशा सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
पाण्याच्या प्रश्नावर काम सुरू : तसेच या भागतील जनतेच्या आरोग्य, रस्ते याबाबतच्या प्रश्नांवर या बैठकीत चर्चा झाली. पाण्याच्या प्रश्नावर काम सुरू झाले आहे. म्हैसाळ पाणीपुरवठा योजनेला मान्यता मिळेला असून कायमस्वरुपी तोडगा निघेल. जत तालुक्यातील लोकांना न्याय देण्याचे काम केले जाईल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले (Upsa irrigation scheme in Jat taluka) आहेत.
तातडीने प्रस्ताव तयार : जत तालुक्यातील काही गाव सातत्याने दुष्काळग्रस्त आहेत. कर्नाटक सरकारने या गावांना कर्नाटकात सामील व्हायचे आहे, असे कर्नाटकचे मुख्यमंत्री मुंबई म्हणाले होते. त्यानंतर या तालुक्यातील काही गावांनी आपल्याला कर्नाटकात पाणी मिळत असल्याने जायचे आहे, अशी इच्छाही व्यक्त केली होती. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भाची ही तातडीची बैठक बोलावली होती. तसेच आज झालेल्या बैठकीतून या भागांमध्ये शासकीय कार्यालयातील पदभरती लवकरात लवकर केली जाईल. तसेच शाळेसाठी आवश्यक तो निधी लवकरात लवकर दिला जाईल. यासाठी जिल्हाधिकारी आणि संबंधित विभागाने तातडीने प्रस्ताव तयार करावे, अशा सूचनाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. या भागातील शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसा पाणी मिळेल शेतात पाणी नेण्यासाठी वीज दिवसा उपलब्ध राहील, यासाठी यंत्रणांनी तातडीने कामाला लागावे, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले (Upsa irrigation scheme) आहेत.