मुंबई : पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी सभागृहात मुद्दा उपस्थित केला की, राष्ट्रवादी काँग्रेसने नागालँडमध्ये सरकारला नाही तर मुख्यमंत्र्यांना पाठिंबा दिला आहे. अर्थातच भाजपला हा पाठिंबा दिला असून बदलाचे नवे वारे आहेत का? असे असेल तर त्याची पण चौकशी करा असे सभागृहात मुद्दा मांडताच विरोधक आक्रमक झाले.
ईशान्येकडील राज्यासाठी परिस्थितीजन्य निर्णय : या संदर्भात विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी सभागृहात पाटील यांना जोरदार आक्षेप घेत सर्वच गोष्टीचे राजकारण करू नका, नागालँडमधील राजकीय परिस्थिती वेगळी आहे. ईशान्येकडील राज्य भारतातच राहावे यासाठी काही निर्णय घ्यावे लागतात. त्यामुळे नागालँड इथले मुख्यमंत्री यांनी पाठिंबा दिला आहे. सर्व केंद्रीय यंत्रणा तुमच्या ताब्यात आहेत तुम्ही कधीही चौकशी करू शकता असे प्रती आव्हान दिले आहे.
काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दगड मारू नये : यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सुनावत म्हटले की, तुम्ही दररोज येऊन खोके खोके करता. दुसऱ्याकडे बोट दाखवतात तेव्हा तीन बोट आपल्याकडे असतात, नागालँडमध्ये बदलाचे वारे हेच का? असे मुख्यमंत्री यांनी टोला लगावला, सरकारला नाही मुख्यमंत्र्यांना पाठिंबा हे कुठले समीकरण आहे असा सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित केला आहे.
पवार देशाचे मोठे नेते : शरद पवार हे या देशाचे मोठे नेते आहेत. मात्र शरद पवार हे आतापर्यंत जे बोलले त्याच्या नेमके उलटे झाले आहे. कसब्याच्या पोट निवडणुकीत विजय मिळवला म्हणून तुम्ही हुरळला. भाजपने तीन राज्य जिंकली ते विसरलात. पिंपरी चिंचवडमध्ये तुमच्या बालेकिल्ला तुम्हाला जागा दाखवली. नागालँड मधे पाठिंबा मागितला नसताना दिला. 2014 मध्ये तुम्ही हेच केले होते ही तुमची जुनी सवय आहे. त्यामुळे काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यावर दगड मारू नये, असे मुख्यमंत्र्यांनी सुनावले.