ETV Bharat / state

CM Eknath Shinde : राज्यात कोळसा निर्मिती वाढीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार - मुख्यमंत्री - CM Eknath Shinde

राज्यात सोन्याच्या खाणी असल्याचा ओझरता उल्लेख मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी मुंबईतील ताज हॉटेलमधील खाण क्षेत्रातील संधी या गुंतवणूकदारांच्या परिषदेत केला होता. राज्यात खनिकर्म संशोधन संस्था सुरू करून या व्यवसायातील अडचणी दूर करून राज्याच्या महसुलासह रोजगारात वाढ झाली पाहिजे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

CM Eknath Shinde
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
author img

By

Published : Dec 2, 2022, 5:12 PM IST

मुंबई : राज्यात सोन्याच्या खाणी असल्याचा ओझरता उल्लेख मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी मुंबईतील ताज हॉटेलमधील खाण क्षेत्रातील संधी या गुंतवणूकदारांच्या परिषदेत केला होता. राज्यात खनिकर्म संशोधन संस्था सुरू करून या व्यवसायातील अडचणी दूर करून राज्याच्या महसुलासह रोजगारात वाढ झाली पाहिजे, असे मुख्यमंत्री म्हणाले. या परिषदेला केंद्रीय खनिकर्म मंत्री प्रल्हाद जोशी, केंद्रीय रेल्वे आणि कोळसा राज्यमंत्री रावसाहेब दानवे, राज्याचे खनिकर्म मंत्री दादाजी भुसे, केंद्रीय खनिकर्म मंत्रालयाचे सचिव विवेक भारद्वाज, केंद्रीय कोळसा मंत्रालयाचे सचिव अमृत लाल मीना आदी उपस्थित होते.

२६० मिलियन टन उत्पादन : याप्रसंगी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, कोळसा काळ्या रंगाचा असतो. स्वच्छ व्यवहार होईल. या घटकाला वाढविण्याचे काम केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी करताहेत. कोळसा खदानीच्या लिलावाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतो. गेल्यावर्षी कोळसा संकट होते. त्यामुळे ऊर्जानिर्मितीला मोठे यश मिळेल, असा आशावाद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. तसेच देशात कोळसा पुरवठा केला जातो. त्यातून स्थानिक लोकांना रोजगार मिळतो. २६० मिलियन टन उत्पादन केले गेले. एक दिवस आपला देश कोळसा उत्पादनात चांगली कामगिरी करेल. कधीकधी कोळसा आयात करावा लागतो. कोळशाची मागणी वाढणार आहे.

राज्यात बरेच पोटेंशियल आहे : राज्याच्या प्रगतीसाठी केंद्र सरकार सहकार्य करणार आहे. २ लाख कोटी रुपये रेल, सडक यासाठी देण्याचा निर्णय केंद्राने घेतला. शहरी विकासासाठी केंद्र सरकार मदत करत आहे. खाण सेक्टरमध्ये सर्व अधिकारी सल्ला मसलत केला जाईल. राज्यात बरेच पोटेंशियल आहे. राज्य, देशाच्या विकासासाठी काम करणार आहोत. मायनिंग इंस्टिट्यूट सुरु केल्यास त्याचा फायदा होईल. राज्यात उद्योग यावेत. रोजगार निर्मिती व्हावी, अशी अपेक्षाही मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केली.

समृद्धी महामार्ग गडचिरोलीपर्यंत : मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, कोळसा बाजारात खुल्या विक्रीसाठी उपलब्ध आहे. कोळशाचे उत्पादन वाढल्यास वीज कपात कमी होईल. मागास राज्यांचा विकास होईल. ओडिसा राज्याला ५ हजार ऐवजी ५० हजार कोटी मिळणार आहेत. राज्यात कोळसा, बॉक्साईड अशी खनिजे आहेत. सोने निघत असेल, तर ही चांगली अचिव्हमेंट असेल. गडचिरोलीला सुरजागडमध्ये खाणी आहेत. काही समस्या होत्या. आता मायनिंग सुरू आहे. पाच ते दहा हजार लोक काम करतात. स्टील प्लँटची तयारी सुरू आहे. कोळसा, पाणी, वीज आहे. मोठा स्टील प्लँट उभा करू. समृद्धी मार्गाला गडचिरोलीपर्यंत पोहचविले जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी दिलं.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.