ETV Bharat / state

मंदिरं सुरू करण्याच्या आंदोलनात भाजप कार्यकर्त्यांनी सक्रीय सहभागी व्हावे; चंद्रकांत पाटलांचे आदेश - chandraknt patil orders party workers

महाराष्ट्रातल्या विविध धार्मिक संस्था आणि प्रमुख देवस्थानांच्या वतीने शनिवारी मंदिरे सुरु करण्यासाठी सकाळी 11 वाजता राज्यभर घंटानाद आंदोलन होणार आहे. या आंदोलनात भाजप कार्यकर्त्यांनी सक्रीय सहभागी व्हावे, असे आदेश चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत.

Chandrakant Patil
चंद्रकांत पाटील
author img

By

Published : Aug 26, 2020, 5:42 PM IST

मुंबई- राज्यातील मंदिरे सुरु करावी ही मागणी जोर धरु लागली आहे. या मागणीसाठी महाराष्ट्रातल्या विविध धार्मिक संस्था आणि प्रमुख देवस्थानांच्या वतीने शनिवारी सकाळी 11 वाजता राज्यभर घंटानाद आंदोलन होणार आहे. भाजपाने या आंदोलनाला संपूर्ण पाठिंबा दिला असल्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले आहेत. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी या आंदोलनात सक्रियपणे सहभागी व्हावे, असे आदेश पाटील यांनी दिले आहेत.

केंद्र शासनाने देवस्थाने सुरु करण्याबाबत यापूर्वीच परिपत्रक जारी केले आहे. देशभरातील प्रमुख देवस्थाने सुरु देखील करण्यात आली आहेत. महाराष्ट्रातही देवस्थाने सुरु करण्याची अनेक व्यक्ती तसेच संघटनांनी राज्य सरकारकडे खूप वेळा मागणी केली. सर्व नियम मान्य करुन देवस्थाने आणि भजन, पूजन, कीर्तन सुरु करावे, ही सर्वांची एकमुखाने मागणी असतानाही, राज्यातील महाविकास आघाडी सरकार ती मान्य करत नाही, असे पाटील यांनी म्हटले.

"ठाकरे सरकार"ला इशारा देण्यासाठी व देवस्थाने सुरु करा या मागणीसाठी शनिवारी राज्यभरात "दार उघड उद्धवा दार उघड" अशी हाक देत "घंटानाद आंदोलन" विविध धार्मिक संस्था व संघटनांतर्फे होणार आहे. या आंदोलनाला भाजपा पूर्ण पाठिंबा देत आहे. पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आदेश पाटील यांनी दिले आहेत. भाजपाच्या कार्यकर्त्यांनी या आंदोलनात सहभागी होताना फेस मास्क वापरणे, फिजिकल डिस्टन्सिंग पाळणे आणि कोरोना विषयक सर्व नियमांचे पालन करावे, अशा सूचना पाटील यांनी केल्या आहेत.

तीर्थक्षेत्र आणि प्रमुख देवस्थांनांच्या परिसरातील असंख्य लोकांची उपजीविका केवळ देवस्थानांवर अवलंबून आहे. त्याचाही राज्य सरकारने सहानुभूतीने विचार करण्याची गरज आहे. 29 ऑगस्टला भाजपा व धार्मिक स्थळ विश्वस्तांचा राज्यभरात होणाऱ्या आंदोलनाला राज्य सरकार कसा प्रतिसाद देते आणि मंदिर उघडण्याबाबत काय निर्णय घेते, हे पाहावे लागणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.