ETV Bharat / state

Chanda Kochhars petition : बँकेने दिलेले पत्र सीबीआयने दाखवले नाही, चंदा कोचर यांची याचिका - आयसीआयसीआय बँक घोटाळा

आयसीआयसीआय बँक घोटाळा प्रकरणात (icici bank scam) सीबीआय अटक केलेल्या आयसीआयसी बँकेच्या माजी एमडी चंदा कोचर (Chanda Kochhar, former MD of ICIC Bank) त्यांच्या संदर्भात आयसीआयसी बँकेने दिलेले पत्र ( given by the bank ) सीबीआय दिले नसल्याने ( the CBI did not show the letter) या विरोधात चंदा कोचर यांच्या वतीने मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय कोर्टात याचिका ( Chanda Kochhars petition) दाखल करण्यात आली आहे.

Chanda Kochhar
चंदा कोचर
author img

By

Published : Dec 31, 2022, 6:53 PM IST

मुंबई: अर्जावर सोमवारी रोजी विशेष सीबीआय कोर्टात सुनावणी होणार आहे. या प्रकरणातील आरोपी चंदा कोचर, दीपक कोचर (Chanda Kochhar, former MD of ICIC Bank) आणि वेणूगोपाल धूत यांची 14 दिवसाच्या न्यायालयीन कोठडीत विशेष सीबीआय कोर्टाने रवानगी केली आहे. सीबीआयने चंदा कोचर यांच्यावर खटला चालवण्यास बँकेकडून मंजूरी देण्यासंदर्भात आयसीआयसीआय बँकेने सीबीआयला 9 जुलै 2021 रोजी लिहिलेल्या पत्राच्या प्रत दिली नसल्याने चंदा कोचर यांनी याचिका दाखल केली होती. हे पत्र चंदा कोचर यांचे वकील अमित देसाई आणि कुशल मोर यांच्या युक्तिवादाच्या केंद्रस्थानी होते.

पत्राचा संदर्भ देत, वकिलांनी दावा केला होता की बँकेने स्पष्टपणे सांगितले आहे की व्हिडिओकॉन समूहाला दिलेल्या कर्जामुळे कोणतेही चुकीचे नुकसान झाले नाही. मात्र त्याची प्रत बचाव पक्षाला देण्यात आली नाही त्यामुळे विशेष न्यायालयासमोर औपचारिक याचिका दाखल करण्यात आली. या अर्जावर सीबीआयने दावा केला आहे की हे प्रकरण तपासाच्या टप्प्यात आहे आणि या टप्प्यावर या प्रकरणाशी संबंधित कोणत्याही कागदपत्रावर दावा करण्याचा आरोपींना अधिकार नाही. याशिवाय सीबीआयने सांगितले की हे पत्र तपास अधिकाऱ्यांनी ठेवलेल्या रेकॉर्डचा भाग आहे.(icici bank scam)

आरोपीच्या कोठडीची मागणी करताना ते न्यायालयासमोर सादर केले गेले. त्यामुळे सीबीआयने म्हटले आहे की याचिका कायद्याने राखता येणार नाही. कोर्ट सोमवारी या याचिकेवर युक्तिवाद होणार आहे. या प्रकरणातील तीनही आरोपींना विशेष न्यायालयात हजर केल्यानंतर सीबीआयचे वकील ए लिमोसिन यांनी न्यायालयाला त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्याची विनंती केली कारण ते सर्व प्रभावीशाली व्यक्ती आहेत या खटल्यातील इतर साक्षीदारांवर प्रभाव टाकू शकतात. सीबीआयने त्यांच्या सीबीआय कोठडीत आणखी वाढ करण्याची मागणी केली नसल्याने विशेष न्यायालयाने तिघांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. चंदा कोचर यांना भायखळा महिला कारागृहात तर दीपक कोचर आणि धूत यांना आर्थर रोड कारागृहात रवानगी करण्यात आले आहे.( the CBI did not show the letter)

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.