मुंबई - आयसीआयसीआय बँक घोटाळा प्रकरणात ( ICICI Bank scam case ) सीबीआय अटक केलेल्या आयसीआयसी बँकेच्या माजी एमडी चंदा कोचर ( Former ICIC Bank MD Chanda Kochhar ) यांच्या वतीने मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय कोर्टात अर्ज दाखल करण्यात आला होता. या अर्जावर आज सोमवारी दिनांक 9 जानेवारी रोजी होणार आहे. आरोपी चंदा कोचर, दीपक कोचर, वेणूगोपाल धूत ( Venugopal Dhoot ) सध्या 14 दिवसाच्या न्यायालयीन कोठडीत आहे.
व्हिडिओकॉनला दिलेल्या कर्जामुळे नुकसान नाही - सीबीआयने चंदा कोचर यांच्यावर खटला चालवण्यास बँकेच्या मंजुरीबाबत 9 जुलै 2021 रोजी सीबीआयला लिहिलेल्या पत्राची प्रत ICICI बँकेने न दिल्यामुळे चंदा कोचर यांनी याचिका दाखल केली होती. हे पत्र चंदा कोचर यांचे वकील अमित देसाई, कुशल मोर यांच्या युक्तिवादाच्या केंद्रस्थानी होते. पत्राचा संदर्भ देत, वकिलांनी दावा केला होता की बँकेने स्पष्टपणे सांगितले आहे की, व्हिडिओकॉन समूहाला दिलेल्या कर्जामुळे कोणतेही नुकसान झाले नाही. मात्र त्याची प्रत बचाव पक्षाला देण्यात आली नाही. त्यामुळे विशेष न्यायालयासमोर औपचारिक याचिका दाखल करण्यात आली.
सोमवारी याचिकेवर युक्तिवाद - या अर्जावर सीबीआयने दावा केला आहे की, हे प्रकरण तपासाच्या टप्प्यात आहे. या टप्प्यावर या प्रकरणाशी संबंधित कोणत्याही कागदपत्रावर दावा करण्याचा आरोपींना अधिकार नाही. याशिवाय सीबीआयने सांगितले की, हे पत्र तपास अधिकाऱ्यांनी ठेवलेल्या रेकॉर्डचा भाग आहे. आरोपीच्या कोठडीची मागणी करताना ते न्यायालयासमोर सादर केले गेले. त्यामुळे कोर्टाच सोमवारी या याचिकेवर युक्तिवाद होणार आहे.
कोठडीत आणखी वाढ करण्याची मागणी - सीबीआयने त्यांच्या सीबीआय कोठडीत आणखी वाढ करण्याची मागणी केली. विशेष न्यायालयाने तिघांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. चंदा कोचर यांना भायखळा महिला कारागृहात तर दीपक कोचर, धूत यांना आर्थर रोड कारागृहात रवानगी करण्यात आले आहे.