ETV Bharat / state

सीईटी परीक्षेला कोरोनाचा 'खो'

author img

By

Published : Mar 19, 2020, 7:01 PM IST

Updated : Mar 19, 2020, 8:27 PM IST

कोरोनाचा वाढता प्रसार आणि त्यातून निर्माण होत असलेला धोका लक्षात घेऊन उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी आज वैद्यकीय, अभियांत्रिकी आदी प्रवेशासाठी घेण्यात येणारी सीईटी ही सामायिक प्रवेश परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे

मंत्री उदय सामंत
मंत्री उदय सामंत

मुंबई - कोरोनाचा वाढता प्रसार आणि त्यातून निर्माण होत असलेला धोका लक्षात घेऊन उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी आज वैद्यकीय, अभियांत्रिकी आदी प्रवेशासाठी घेण्यात येणारी सीईटी ही सामायिक प्रवेश परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. यात राज्यातील एकाही विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही, याची काळजी घेतली जाणार असल्याचेही मंत्री सामंत यांनी सांगितले. यासोबत कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग जिल्ह्यातील प्रत्येक घरात मास्क मोफत देण्यासाठी डीपीसीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्याची संकल्पना घेऊन त्यासाठी उद्या (शुक्रवार) एक आढावा बैठक घेणार असल्याची माहितीही सामंत यांनी दिली.

बोलताना मंत्री उदय सामंत

राज्यातील परिस्थिती लक्षात घेऊन आम्ही सीईटी ही परीक्षा पुढे ढकण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात ही परीक्षा 29 तारखेपासून सुरू होणार आहे. यासंदर्भात राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाचे अध्यक्ष हे केंद्र सरकारला पत्र लिहणार असून त्यात केंद्राने यासाठी मार्गदर्शन करावे, अशी विनंती केली जाणार असल्याचेही मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

विद्यापीठांना सुट्टीचे अधिकार कुलगुरूंना

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये कर्मचारी, अधिकाऱ्यांची कामावर असलेल्यांची संख्या ही 50 टक्के असावी, असा निर्णय आम्ही घेतला आहे. त्यात यांना रोटेशन प्रमाणे बोलावणे अपेक्षित आहे, तरीही परिस्थिती लक्षात घेऊन जर एखाद्या ठिकाणी गरज पडली तर शंभर टक्के सुट्टी देण्याचे अधिकार आम्ही कुलगुरूंना दिले असल्याची माहितीही त्यांनी दिली.

कोकणात बार, परमिट रूम, दुकाने बंद

सिंधुदूर्ग जिल्ह्यात कोरोना बाधीत रुग्ण आढळल्याच्या संदर्भात विचारले असता मंत्री सामंत म्हणाले की, तळकोकणात कोरोनाची लागण झाली आहे. भविष्यात काही परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून बार, परमिट रुम, वाईन शॉप आणि सगळी दुकाने बंद करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यासोबतच या जिल्ह्यांमध्ये मास्क हा डीपीसीच्या निधीतून प्रत्येक घरात देण्यात अशी संकल्पना घेऊन बैठक घेणार असल्याची माहितीही मंत्री सामंत यांनी दिली. तसेच मास्कचा काळाबाजार होत आहे. हे लक्षात घेऊन जर कोणी संधीचा गैरफायदा घेत असेल तर त्यांच्या गुन्हे दाखल करण्याच्या सूचनाही दिली असल्याचे मंत्री सामंत यांनी सांगितले.

हेही वाचा - कोरोना इफेक्ट; महानगरपालिकांना अतिक्रमण हटवण्यास उच्च न्यायालयाची स्थगिती

Last Updated : Mar 19, 2020, 8:27 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.